Smrutichitre

 

A non-profit organization-Akshaybhasha , Mesa, AZ 85213; Tax ID- 30-0280809.

स्मृतिचित्रे” या लक्ष्मी बाई टिळकांच्या आत्म चरित्राचे स्थान मराठीच्या गाभाऱ्यात ज्ञानेश्वरी – दासबोध या ग्रंथां जवळ ! हा मराठी स्त्री-पुरुषांचा इतिहास. या पुस्तकातील भाषा खरी मराठी भाषा समजल्या जाते- शुध्द व बाळबोध; इंग्रजीची सावली न पडलेली व संस्कृतच्या सावलीत न खुरटलेली ! मराठी माणसाने आयुष्याच्या प्रत्येक इयत्तेत वाचावे असे पुस्तक; प्रत्येक मराठी माणसाकडे असावे असे संग्राह्य पुस्तक! या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन करून त्याचे कलेतून इतरेजनांना दर्शन घडवावे हे प्रत्येक मराठी कलाकाराचे स्वप्न किंवा त्याच्या स्वाध्यायातील पहिला पाठ ! या तर मग, लक्ष्मी बाईंचे बोट धरून आपण इतिहासाच्या पानात फिरून येऊ !

कल्पना – भाग्यश्री बारलिंगे
दिग्दर्शन – शिल्पा केळकर
कलाकार – शिल्पा केळकर, शलाका वाकणकर, प्राजक्ती कुलकर्णी आणि संदीप पटवर्धन
तांत्रिक मदत- चंद्रकांत बारलिंगे
कार्यक्रम राजश्री व अमित सोमण यांच्या निवास स्थानी (2777 E Taurus Place, Chandler 85249 ) ऑक्टोबर २४, शनिवार या रोजी दुपारी ४ ते ६ योजिला आहे.
आपल्या येण्याचा मानस ऑक्टोबर २० च्या आत कळवावा.
शुल्क : पाच डॉलर्स प्रत्येकी; वय वर्षे सहा च्या खालील मुलांसाठी नि:शुल्क.