Waarasa movie screening Invitation

akshaybhasha-bookmark.gif

फिनिक्सच्या संवेदनशील लोकांना आवाहन –

आदरणीय समाज सेवक राम भाऊ इंगोले यांच्या कार्यावर आधारित, प्रसिद्ध कलाकार अरुण नलावडे (ऑस्कर नाॅमिनेटेड “श्वास ” फेम ) यांनी दिग्दर्शित व अभिनित केलेला चित्रपट “वारसा” फिनिक्स महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने अक्षयभाषे तर्फे दाखवल्या जाईल. त्याचे हे खास निमंत्रण ! ही कलाकृती समाजाचे एक वेगळे अंग दाखवून तुम्हाला अंतर्मुख करेल. आपल्यावर असलेल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देईल.

तारीख : २३ एप्रिल, २०१६ , शनिवार
स्थळ : प्राजक्ती व सतीश पुराणिक यांचे निवास स्थान (3518 East Nocona Lane, Phoenix 85050)
वेळ : दुपारी ४ ते ६:३०
अपेक्षित शुल्क $१० प्रत्येकी; सहा वर्षांखालील मुलांना नि:शुल्क; ज्येष्ठ व्यक्तीं साठी ( वय वर्षे ६५ च्या वर ) शुल्क प्रत्येकी $५.
चहा-फराळ-आसन यांची योग्य सोय करता यावी यासाठी आपल्या येण्याचे मनोगत लवकरात लवकर उलट टपाली कळवावे. (info@akshaybhasha.org; akshaybhasha@cox.net)

राम भाऊ इंगोले यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी नागपूर मधील गंगा जमना वस्तीतील मुलांना आसरा द्यायला सुरवात केली; सध्या सत्तावीस मुलं -मुली “विमल आश्रम ” नावाच्या घरात राहातात जिथे त्यांना अन्न,वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजांबरोबर शालेय शिक्षण, सुरक्षितता व मानाने जगण्याची संधी मिळते. या मुलांनी पणतीने पणती लावावी त्याप्रमाणे नागपूर जवळ च्या पांचगाव नावाच्या खेड्यात खाण कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा काढली. तिथे १६० मुलं आहेत. पहिली ती दहावी पर्यंत वर्ग भरवण्याची computer पासून सोय आहे. पण चांगले शिक्षक मिळणे कठीण.एका well-trained शिक्षकाला १० ते १२ हजार रुपये दर महा पगार द्यावा लागतो. मुलांची शालेय वर्षे वाया जाऊ द्यायची नसतील तर आपल्याला त्वरित मदत करून तिथे इंटरनेट ची सोय केली पाहिजे; नागपूरच्या शाळांमधल्या वर्गांचे प्रक्षेपण skype द्वारा करून शिक्षकांची उणीव काही अंशी तरी भरून काढता येईल.

आपल्या उदार देणगीमधून या मुलांसाठी निवासी शिक्षक किंवा skype शिक्षक यांची सोय करता येईल. एका निवासी शिक्षकाला एका शालेय वर्षाचा किमान एक लाख वीस हजार रुपये ($1760 ) इतका खर्च येतो. एका मुलाचा वर्षाचा खर्च पंधरा ते वीस हजार रुपये येतो (जवळ पास $250 ). अमेरिकेत अक्षय भाषा या non-profit संस्थेला जर देणगी दिली तर ती पूर्णपणे या विशिष्ठ
कार्यासाठी वापरली जाईल. देणगी दाराला 30-0280809 हा tax ID वापरून देणगीवर tax exemption मिळेल.

भारतात रुपयांमध्ये देणगी द्यायची असेल तर चेक वर पुढील माहिती लिहावी- “आम्रपाली उत्कर्ष संघ”, account number 62002164603. IFSC code : SBHY 0020539. State Bank of Hyderabad, kelkar road, khadiya complex, Mahal, Nagpur.
स्नेहांकित ,
अक्षयभाषा कमिटी

1px
©2016 akshaybhasha | Nurture language // Nurture culture
1px
Web Version Forward