(कंटाळ्यापासून) वाचवणारे वाचन
मंडळी,
‘करोना’मुळे मनावर मरगळ आलेली आहे; आपल्यावर कुठल्याही क्षणी ही आपत्ती कोसळेल अशी कुशंका मनाला छळते आहे. अशा दारुण परिस्थितीत कंटाळ्याला बळी न पडता, सामाजिक अंतर राखण्याच्या सोवळ्याचे पालन करून आपण एकमेकांची मने नक्कीच उत्फुल्ल ठेवू शकतो. पुस्तके अशा वेळी मदतीला येतात. तुमच्या स्वत:च्या किंवा तुमच्या आवडत्या कविता, नाटकातले संवाद, पुस्तकातील उतारे वाचून त्याचं रेकाॅर्डिंग (maximum 5 min long) info@akshaybhasha.org इथे इमेल करा. ते योग्य असल्यास अक्षयभाषा वेबसाईटवर post केल्या जाईल.
धन्यवाद!
तुम्ही सर्व या अदृश्य शत्रूपासून स्वत:चा यशस्वीपणे बचाव कराल, या शुभेच्छा !
अक्षयभाषेतर्फे जाहीर केलेले सर्व सामाजिक कार्यक्रम अर्थातच रद्द केले आहेत.
स्नेहांकित,
भाग्यश्री बारलिंगे
अध्यक्षा
अक्षयभाषा