AKSHAYBHASHA PROGRAM ON FEBRUARY 27, 2016 SATURDAY

akshaybhasha-bookmark.gif

मंडळी,

या वर्षीचा अक्षयभाषा या संस्थेचा पहिला कार्यक्रम “कथा कोलाज” फेब्रुवारी २७, शनिवार या रोजी प्राजक्ती व सतिश पुराणिक यांच्या निवास स्थानी
(3518 east Nocona Lane, Phoenix, AZ 85050 ) दुपारी चार ते सहा योजिला आहे. तरी रसिकांनी या दुर्मिळ सादरी करणाला हजर राहून वेगवेगळ्या विषयांवरच्या कथांचा आस्वाद घ्यावा व कलाकारांचा उत्साह वाढवावा. कार्यक्रमात पांच कथांचे कथन होईल. त्यापैकी पहिल्या दोन कथा आपल्याला बक्षीस प्राप्त लेखिकांकडूनच ऐकायला मिळणार आहेत हा दुग्ध शर्करा योग !
> > १. रोहिणी अभ्यंकर त्यांची “रेऊ” कथा स्पर्धेत निवडली गेलेली “पायरव ” ही कथा सादर करतील ;
> > २. शिल्पा उपाध्ये त्यांची “एकता” मासिकाच्या कथास्पर्धेत निवडली गेलेली “खिडकी” ही कथा सादर करतील.
तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास तुम्हाला आवडलेली (तुमची स्वतःची किंवा इतरांची ) कथा शिल्पा उपाध्ये यांना kelkar shilpa @gmail .com या पत्त्यावर पंधरा फेब्रुवारीच्या आत पाठवावी. तुमची कथा निवडली गेल्यास कार्यक्रमाच्या काही दिवस आधी कमीत कमी एकदा तालमी साठी जमण्याची तयारी ठेवावी.
स्नेहांकित ,
अक्षयभाषा कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *