2021 Kathaspardha flipbook monitor view

2020 Kathaspardha flip book monitor view

2020 Kathaspardha flipbook cell phone view

एकता – अक्षयभाषा कथास्पर्धा २०२०/२१ इ-बुक

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-202…ook-monitor-view/

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-202…ook-monitor-view/

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-2021-e-book/

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-2020-e-book/

नमस्कार मंडळी,
एकता- अक्षयभाषा कथास्पर्धेचा निकाल जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. उत्तर अमेरिकेतील लेखकांनी या स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !
कथांचे मूल्यांकन विद्युल्लेखा अकलुजकर, प्रकाश लोथे आणि विनता कुलकर्णी  या विद्वान व अनुभवी परिक्षकांनी समर्थपणे हाताळले. विद्युल्लेखा अकलुजकर या एकता मासिकाच्या संपादक -सल्लागार म्हणून व अनेक उत्तम पुस्तकांच्या सिद्धहस्त लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. प्रकाश लोथे हे पारितोषिक विजेती कादंबरी ‘धर्मधुरीण’ व ‘वाटचाल’ हे गाजलेले नाटक ह्यांचे लेखक आणि राष्ट्रपती पदकाने विभूषित चित्रपट ‘कासव’ ह्याचे निर्माते म्हणून ओळखले जातात. विनता कुलकर्णी ह्या उत्तम लेखिका असून बृहन महाराष्ट्र वृत्त (BMM Newsletter) गेली अनेक वर्षे निरलसपणे संपादित करताहेत. तसेच त्यांनी online विश्व मराठी साहित्य संमेलन २०२१ (विदेश विभाग) याचे मानाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची अनेक पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.
या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कथांचे योग्य मूल्यमापन केले त्याबद्दल अक्षयभाषा ही संस्था त्यांची ऋणी आहे. 
एकता मासिक आणि फाउंडेशन यांचे संस्थापक श्री. विनायक गोखले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासाठी आयोजक त्यांचे आभारी आहेत.

कथास्पर्धा २०२१ चा निकाल खालील प्रमाणे –

विजेत्या कथा –

क्रमांक १- मावळतीचे रंग – संजय गोखले

क्रमांक २- वाल्या कोळ्याची बायको – पद्मिनी दिवेकर

क्रमांक ३- मंगळ – गायत्री गद्रे

उल्लेखनीय कथा –

ससा भानोशी आला – प्रियदर्शन मनोहर

तुझीमाझी गोष्ट – सुधा गोरे

तसदी बद्दल क्षमस्व – कौस्तुभ एरंडे

निरभ्र – स्मिता शानभाग-माथूर

नवजन्म – प्राजक्ता पाडगांवकर

जगण्याला लय आली – श्रध्दा भट

चौकट – अनु महाबळ

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !

येत्या काही आठवड्यात वरील सर्व कथा इ-बुकात प्रसिद्ध होतील. विजेत्या कथांचे अक्षयभाषा कलाकारांकडून कॅन्सस सिटी मधील उदयन आपटे यांच्या ‘मराठी अमेरिकन रेडिओ’ ह्या पॅाडकास्टवर भाववाचन केले जाईल.

पुढच्या कथास्पर्धांनाही उत्तर अमेरिकेतील लेखकांकडून असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहील अशी आशा आहे !

आपल्या प्रिय देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन !

आयोजक
अक्षयभाषा

अक्षयभाषेचे २०२१ च्या पूर्वार्धातील कार्यक्रम

नमस्कार मंडळी,

सहर्ष सादर करीत आहोत अक्षयभाषेचा नवीन उपक्रम –

        • चांदोबातील गोष्टी –  हा मनोरंजक कार्यक्रम म्हणजे लहान मुलांपर्यंत मराठी पोचवण्याचा एक मार्ग. आशा आहे की तुम्हां सगळ्यांना तो आवडेल. तुमच्या सूचना, शेरे, प्रश्न नक्की कळवा.
        • स्त्रीचे व्यक्तिमत्वएक मनोहर पिसारा‘-शतकापुर्वीच्या पंडिता रमाबाई ते आधुनिक जगातील जानकी अम्मल व सालूमरद तिम्मक्का असा आढावा घेणारा हा अभिवाचनांचा दर्जेदार आगळा-वेगळा कार्यक्रम. ही आहे एक वैचारिक करमणूक, कलाकाराला व श्रोत्यांना समृद्ध करणारी! तुमचा या सादरीकरणांवरचा प्रतिसाद लेखक व अभिवाचकांसाठी महत्वाचा राहील.
          • कोरोना आणि स्थित्यंतर’ हे आहे मनोगत फिनीक्सच्या रहिवास्यांचे. तुमच्या भावनांचे, विचारांचे पडसाद या वेगवेगळ्या ललित लेखांमध्ये तुम्हांला उमटलेले दिसतील. हा कार्यक्रम म्हणजे कोरोना काळाची केलेली आवश्यक अशी नोंद आहे. या लेखांविषयी तुमची मते जरूर कळवा.

इतर संस्थांचे महत्वाचे कार्यक्रम

१. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूर – स्त्रियांच्या तीन पिढ्यांमधील अंतर्मुख करणारा संवाद –अंतर्बंध’ – https://www.facebook.com/AbhivyaktiNagpur/ (click on posts).

२. मिळून साऱ्याजणी आणि चांगुलपणाची चळवळ आयोजित ‘विद्या बाळ अध्यासन’ प्रकल्पांतर्गत गावोगावीच्या विचारदुतांबरोबर गप्पा

https://www.facebook.com/saryajani/videos/890489215130993

३. चांगुलपणाच्या चळवळी मार्फत साहित्यातून सांस्कृतिक समृद्धीकडे वाटचाल” या विषयावर सुप्रसिद्ध लेखक-संपादक श्री भानु काळे यांची मुलाखत घेताहेत सौ.शुभांगी मुळे.
https://youtu.be/VHUNlhY0v3k

एकता -अक्षयभाषा कथास्पर्धा 2021

 

एकताअक्षयभाषा कथास्पर्धा वर्ष दुसरे
कथा पाठवण्याची अंतिम तारीख – ४ जुलै २०२1
कथा या इमेल वर पाठवाव्यात– akshaykathaspardha@gmail.com
कथेच्या पहिल्या किंवा इतर कोणत्याही पानावर लेखकासंबंधी माहिती नसावी

– आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद.

Smrutichitre

 

A non-profit organization-Akshaybhasha , Mesa, AZ 85213; Tax ID- 30-0280809.

स्मृतिचित्रे” या लक्ष्मी बाई टिळकांच्या आत्म चरित्राचे स्थान मराठीच्या गाभाऱ्यात ज्ञानेश्वरी – दासबोध या ग्रंथां जवळ ! हा मराठी स्त्री-पुरुषांचा इतिहास. या पुस्तकातील भाषा खरी मराठी भाषा समजल्या जाते- शुध्द व बाळबोध; इंग्रजीची सावली न पडलेली व संस्कृतच्या सावलीत न खुरटलेली ! मराठी माणसाने आयुष्याच्या प्रत्येक इयत्तेत वाचावे असे पुस्तक; प्रत्येक मराठी माणसाकडे असावे असे संग्राह्य पुस्तक! या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन करून त्याचे कलेतून इतरेजनांना दर्शन घडवावे हे प्रत्येक मराठी कलाकाराचे स्वप्न किंवा त्याच्या स्वाध्यायातील पहिला पाठ ! या तर मग, लक्ष्मी बाईंचे बोट धरून आपण इतिहासाच्या पानात फिरून येऊ !

कल्पना – भाग्यश्री बारलिंगे
दिग्दर्शन – शिल्पा केळकर
कलाकार – शिल्पा केळकर, शलाका वाकणकर, प्राजक्ती कुलकर्णी आणि संदीप पटवर्धन
तांत्रिक मदत- चंद्रकांत बारलिंगे
कार्यक्रम राजश्री व अमित सोमण यांच्या निवास स्थानी (2777 E Taurus Place, Chandler 85249 ) ऑक्टोबर २४, शनिवार या रोजी दुपारी ४ ते ६ योजिला आहे.
आपल्या येण्याचा मानस ऑक्टोबर २० च्या आत कळवावा.
शुल्क : पाच डॉलर्स प्रत्येकी; वय वर्षे सहा च्या खालील मुलांसाठी नि:शुल्क.