2017-An Evening with Mrs. Sumitra Bhave सुमित्रा भावे यांची अक्षयभाषा, फीनिक्स या संस्थेला भेट

This slideshow requires JavaScript.

लेखिका – शिल्पा उपाध्ये

सुप्रसिद्ध फिल्ममेकर, दिग्दर्शिका सुमित्रा भावे फिनिक्स मधे आल्या आणि आमच्या वाळवंटी गावात नंदनवन फुलले. अतिशय नम्र, मनमिळावू आणि लाघवी व्यक्तिमत्वाने त्यांनी जिंकले सर्वांना. “विद्या विनयेन शोभते” याचे मूर्तिमंत जिवंत रूप म्हणजे सुमित्राताई. त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, प्रश्न विचारले. त्या स्वतः स्क्रिप्ट कसे लिहितात, सिनेमा कसा बनतो… सगळं सांगितलं आणि कानात प्राण आणून ऐकलं.
“निकृष्ट दर्जाची कुठलीही कलाकृती बनवणारे म्हणतात, आम्ही बनवतो कारण त्याला लोकांची मागणी असते, आमचं हे बनवणं म्हणजे समाजाचं प्रतिबिंब आहे” हे जे म्हटलं जातं ते किती खोटं आहे हे त्या पोटतिडकीने सांगत होत्या. “कुणीही असो भेळवाला असो, भाजीवाला असो, झाडूवाला असो, डॉक्टर असो किंवा सिनेमावाला असो, प्रत्येकाने आपला व्यवसाय जर प्रमाणिकपणे केला तर कधीच काही निकृष्ट नाही बनणार. आपल्याच व्यवसायात खरे खोटेपणा कसा आणता हा प्रश्न आहे मोठा.
आपण जे काही समाजाभिमुख काम करतो, किंवा अगदी काहीही साधं लिहितो, त्यातूनही आपण सांस्कृतिक इतिहास बनवत असतो सतत. याचं भान ठेऊन प्रत्येकानं काम केलं तर ते चांगल्या दर्जाचं होईल” – सुमित्रा भावे.
हे असे सोनेरी शब्दस्पर्श आयुष्य समृद्ध करत राहतात.