Performances कलात्मक सादरीकरणे

[siteorigin_widget class=”WP_Widget_Media_Video”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”WP_Widget_Media_Video”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”WP_Widget_Media_Video”][/siteorigin_widget]
Photos of the event – Celebrating universal Tagore, Nov 4, 2017-Part 1

2017-An Evening with Mrs. Sumitra Bhave सुमित्रा भावे यांची अक्षयभाषा, फीनिक्स या संस्थेला भेट

This slideshow requires JavaScript.

 

लेखिका – शिल्पा उपाध्ये

सुप्रसिद्ध फिल्ममेकर, दिग्दर्शिका सुमित्रा भावे फिनिक्स मधे आल्या आणि आमच्या वाळवंटी गावात नंदनवन फुलले. अतिशय नम्र, मनमिळावू आणि लाघवी व्यक्तिमत्वाने त्यांनी जिंकले सर्वांना. “विद्या विनयेन शोभते” याचे मूर्तिमंत जिवंत रूप म्हणजे सुमित्राताई. त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, प्रश्न विचारले. त्या स्वतः स्क्रिप्ट कसे लिहितात, सिनेमा कसा बनतो… सगळं सांगितलं आणि कानात प्राण आणून ऐकलं.
“निकृष्ट दर्जाची कुठलीही कलाकृती बनवणारे म्हणतात, आम्ही बनवतो कारण त्याला लोकांची मागणी असते, आमचं हे बनवणं म्हणजे समाजाचं प्रतिबिंब आहे” हे जे म्हटलं जातं ते किती खोटं आहे हे त्या पोटतिडकीने सांगत होत्या. “कुणीही असो भेळवाला असो, भाजीवाला असो, झाडूवाला असो, डॉक्टर असो किंवा सिनेमावाला असो, प्रत्येकाने आपला व्यवसाय जर प्रमाणिकपणे केला तर कधीच काही निकृष्ट नाही बनणार. आपल्याच व्यवसायात खरे खोटेपणा कसा आणता हा प्रश्न आहे मोठा.
आपण जे काही समाजाभिमुख काम करतो, किंवा अगदी काहीही साधं लिहितो, त्यातूनही आपण सांस्कृतिक इतिहास बनवत असतो सतत. याचं भान ठेऊन प्रत्येकानं काम केलं तर ते चांगल्या दर्जाचं होईल” – सुमित्रा भावे.
हे असे सोनेरी शब्दस्पर्श आयुष्य समृद्ध करत राहतात.

2016-Photos of the Felicitation of Mrs Asha Bage लेखिका आशा बगे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम

This slideshow requires JavaScript.

2015-Smrutichitre : Bhavwachan स्मृतिचित्रे : भाववाचन

smrutichitre photo 1

स्मृतिचित्रे : भाववाचन -निवेदन करताना भाग्यश्री बारलिंगे , काळ्या साडीत शिल्पा केळकर-उपाध्ये , हिरव्या साडीत प्राजक्ती कुलकर्णी

smrutichitre photo 2

स्मृतिचित्रे : भाववाचन-प्रहसन करताना संदीप पटवर्धन आणि शलाका वाकणकर

smrutichitre photo 3

स्मृतिचित्रे : भाववाचन-रंगलेले प्रेक्षक

“स्मृतिचित्रे” या लक्ष्मी बाई टिळकांच्या आत्म चरित्राचे स्थान मराठीच्या गाभाऱ्यात ज्ञानेश्वरी – दासबोध या ग्रंथां जवळ ! हा मराठी स्त्री-पुरुषांचा इतिहास. या पुस्तकातील भाषा खरी मराठी भाषा समजल्या जाते- शुध्द व बाळबोध; इंग्रजीची सावली न पडलेली व संस्कृतच्या सावलीत न खुरटलेली ! मराठी माणसाने आयुष्याच्या प्रत्येक इयत्तेत वाचावे असे पुस्तक; प्रत्येक मराठी माणसाकडे असावे असे संग्राह्य पुस्तक! या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन करून त्याचे कलेतून इतरेजनांना दर्शन घडवावे हे प्रत्येक मराठी कलाकाराचे स्वप्न किंवा त्याच्या स्वाध्यायातील पहिला पाठ !

या तर मग, लक्ष्मी बाईंचे बोट धरून आपण इतिहासाच्या पानात फिरून येऊ !

कलाकार – शिल्पा केळकर-उपाध्ये, शलाका वाकणकर, प्राजक्ती कुलकर्णी आणि इतर.
दिग्दर्शन – शिल्पा केळकर-उपाध्ये
कल्पना – भाग्यश्री बारलिंगे
तांत्रिक मदत- चंद्रकांत बारलिंगे

कार्यक्रम राजश्री व अमित सोमण यांच्या निवास स्थानी (2777 E Taurus Place, Chandler 85249 ) ऑक्टोबर २४, शनिवार या रोजी दुपारी ४ ते ६ योजिला आहे.
आपल्या येण्याचा मानस ऑक्टोबर २० च्या आत कळवावा.
शुल्क : पाच डॉलर्स प्रत्येकी; वय वर्षे सहा च्या खालील मुलांसाठी नि:शुल्क.

2014-Prof. Madhuri Shanbhag Interview प्रो. माधुरी शानभाग यांची मुलाखत व ‘मृदगंध’ पुस्तक प्रकाशन

fragrance of the earth- Prof. madhuri shanbhag- prakashan

नमस्कार मंडळी ,

अक्षय भाषेच्या आगामी कार्यक्रमाची योजना येणेप्रमाणे –
तारीख- सत्तावीस सप्टेंबर, २०१४ (शनिवार)
वेळ – दुपारचे चार
स्थळ – बारलिंगेंचे निवास स्थान

कार्यक्रम- दोन ते अडीच तास —

१. एकांकिका -बस स्टॉप – लेखिका- भाग्यश्री बारलिंगे; दिग्दर्शिका – शिल्पा केळकर -उपाध्ये ;
कलाकार – शिल्पा केळकर -उपाध्ये, रेणुका शेंबेकर, संदीप पटवर्धन, नरेन गोडबोले, सुजय मेहता.
२. मध्यांतर
३. प्रसिद्ध लेखिका श्रीमती माधुरी शानभाग ह्यांच्याशी ” Fragrance of the Earth ( Poems of Bahina bai ) ” ह्या त्यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या चाकोरी बाहेरच्या पुस्तकाविषयी चर्चा ,
४. अभंग गायन – मुग्धा लिमये , नचिकेत रारावीकर. तांत्रिक मदत -चंद्रकांत बारलिंगे.

ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला जरूर यावे ही विनंती !
चहा /फराळ व आसन यांची योग्य सोय करता म्हणुन आपल्या येण्याचा बेत लवकरात लवकर E-mail द्वारे akshaybhasha@cox.net या पत्त्यावर कळवावा.

प्रवेश शुल्क – प्रत्येकी पाच डॉलर्स.

आपले स्नेहांकित ,
अक्षयभाषा कार्यकारिणी-
भाग्यश्री बारलिंगे, प्रसाद पानसे, आरती लेले, राजश्री सोमण.

//मनन भाषेचे, जतन संस्कृतीचे//

2012-Program on Kavi Grace कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम

नाहीच कुणी अपुलेरे, प्राणांवर नभ धरणारे ,

दिक्काल धुक्याच्या वेळी, हृदयाला स्पन्दविणारे

असे काळीज विदीर्ण करण्याऱ्या ओळी लिहणारे दुःखाचे महाकवी ग्रेस !

मराठीच्या पायात शब्दांचे नादमय पैंजण बांधणारे कवी ग्रेस!

दुर्बोधतेचे न सुटणारे कोडे घालणारे कवी ग्रेस!

दुर्गाबाई भागवतांच्या मते –दैवी, मानवी, पाशवी जीवनवृत्तींचे अद्भुत मिश्रण ज्यांच्या कवितेतून झाले आहे असे कवी ग्रेस!

धूसर, गूढ प्रतिमा सृष्टी निर्माण करणाऱ्या या कवीची कविता कळली नसल्याची कबुली साहित्यातील मान्यवरांनी दिली आहे.

अक्षयभाषा सादर करीत आहे –

ग्रेस -एक संपूर्ण कलाकार–शब्द , नाद, नृत्य यामधून ग्रेसना समजण्याचा एक नम्र आणि हौशी प्रयत्न

दोन डिसेंबर, रविवार रोजी दुपारी चार ते सहा बारलिंगे यांच्या निवासस्थानी !

रसिकांनी येऊन उपकृत करावे ही विनंती.

तांत्रिक मदत : चंद्रकांत बारलिंगे

या कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायचे असल्यास कृपया akshaybhasha@cox.net या पत्त्यावर संपर्क साधा.

 

ज्यांना मराठी वाचायला आवडते त्यांच्यासाठी

https://www.lekhakonline.com/            …नवीन लेखक…उत्कृष्ट कथा …कथेचे भिन्न प्रकार