अक्षयभाषा संस्था २००५ साली फिनीक्स, ॲरिझोना येथे स्थापन झाली. https://akshaybhasha.org
संपर्क : संस्थापिका- भाग्यश्री बारलिंगे [email protected]
या संस्थेचे उद्दिष्ट ‘मराठी भाषेची गोडी वाढवून तिचे जतन करणे’ हे होय.
या साठी खालील उपक्रम आयोजित केले गेले किंवा होऊ घातले आहेत –
१. आबालवृद्धांसाठी प्राथमिक शाळेतील कवितांपासून दुर्गाबाईंच्या लिखाणापर्यंतचा अनुभव देणारा कार्यक्रम,
२. रंगमंचावर सादर केलेली बालनाट्ये -बाहुलीचे लगीन, मुहूर्त, डब्बाचोर, बालशिवाजी
३. रंगमंचावर सादर केलेल्या एकांकिका- लग्नाला जातो मी, निर्णय, विरंगुळा, इत्यादी
४. रंगमंचावर सादर केलेले भव्य कार्यक्रम- युनिव्हर्सल टागोर, पुलोत्सव, त्रिवेणी,
५. ऑन लाईन कार्यक्रम – पाऊस, दार, पुलोत्सव, चांदोबातील गोष्टी इत्यादी,
६. उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांसाठी एकता-अक्षयभाषा कथास्पर्धा,
https://akshaybhasha.org/2023/08/e-book-kathaspardha-2023/
७. उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून झूमवर मुलाखती,
८. उत्तर अमेरिकेतील अमराठी लेखकांच्या मुलाखती – “शब्दकर्मी” चॅनेलवर,
९. “वाटा आणि मुक्काम” या चार दिग्ग्ज लेखकांनी ( आशा बगे, सानिया, भारत सासणे, मिलिंद बोकील ) लिहिलेल्या पुस्तकावर आधारित युट्यूब मालिका,
१०. नुकतेच सुरु होणारे चर्चासत्र – BMM प्रायोजित “मुलं परदेशी, आईवडील मायदेशी” ही झूम आधारित मालिका.
११. सामाजिक ऋणफेड – अनिमिया प्रोजेक्ट https://akshaybhasha.org/?s=anemia+
पॅलिएटिव्ह केयर प्रोजेक्ट https://akshaybhasha.org/palliative-care-…a-harali-solapur/