1 प्रसन्न वृध्द व्यक्ती सांभाळ केंद्र पुणे संपर्क : राजेश अलोणे – 9850442982.
या सात महिन्यात ६ वृद्धाचा प्रवेश झाला.वय वर्ष ७८ ते ९६ या वयोगटातील वृध्द स्त्री पुरुष होते व आहेत.यातील दोन पुरुष वृध्द कर्क रोगाशी झुंज देत होते.एका आजोबांना अन्न नलिकेचा कर्करोग होता तर एकांना प्रोस्टेट कॅन्सर होता.त्यात प्रोस्टेट कॅन्सर असणाऱ्या आजोबांना प्याऱ्यालिसिस सुद्धा होता.दोघांनाही डायपर ,स्पंजींग आणि सगळ्यांच्या गोष्टींसाठी मदत लागत होती. जेवण भरवणे,कपडे बदलले इत्यादी.हा सर्व अनुभवांनी आम्ही आत्ता समृद्ध झालोत.
अगदी माफक मासिक सेवा शुल्कात रू.१०,००० ( चालते फिरते वृध्द ,) रू.१२,००० ( सहाय्यक लागत असल्यास) व रू.१८,००० (बेड रिडन) असल्यास सेवा देतो.तात्पुरती सोय सुद्धा उपलब्ध आहे.
संपर्क : राजेश अलोणे – 9850442982.
प्रसन्न वृध्द व्यक्ती सांभाळ केंद्र,१०४, पहिला मजला, अमृतवेल ग्रीन बिल्डिंग हॉटेल स्वागत शेजारी सिंहगड रोड कोल्हे वाडी पुणे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02XrtkUx6wjtctZqG9gZtgH4hAkfdMQv5gJib4wjDYiVRdyXDpL5twZmxivBzUSWKJl&id=100089828810759&mibextid=RtaFA8
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02XrtkUx6wjtctZqG9gZtgH4hAkfdMQv5gJib4wjDYiVRdyXDpL5twZmxivBzUSWKJl&id=100089828810759&mibextid=RtaFA8
*************************************************************
2 Maya care foundation-महाराष्ट्रभर www.mayacare.org [email protected] 1-800-572-1343
घरात एकटे राहणारे जेष्ठ नागरिक , आजी व आजोबा असे दोघेच राहणारे जेष्ठ नागरिक शहरातून मोठ्या संख्येने असतात, अशा एकट्या राहणाऱ्या किंवा दुकट्या राहणाऱ्या किंवा अपंग असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मदत करून त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकारक करणारी एक संस्था “माया केअर फौंडेशन ” सन २००९ पासून कार्यरत आहे. सौ.मंजिरी गोखले जोशी आणि श्री.अभय जोशी या दाम्पत्याने हि संस्था सुरु केली आहे . यंदा हि संस्था १४व्या वर्षात पदार्पण करीत असून आत्तापर्यंत संस्थेच्या स्वयंसेवकांनी 18000 हजार पेक्षा जास्त वेळा अशा वृद्धांच्या घरी भेटी देऊन सुमारे 2 हजार जेष्ठ नागरिकांना मदत केली आहे . ज्या घरात जेष्ठ नागरिक एकटे असतात किंवा आजी आजोबा असे दोघेच जण असतात किंवा कुटूंबात राहूनही अपंग असलेल्या वृद्धांना हि संस्था मदत करते , सध्या जेष्ठ नागरिकांच्या एकटेपणाचे प्रमाण वाढले आहे . मुले नोकरी धंद्यासाठी परगावी असतात ,परदेशी असतात आणि मुला-बाळांबरोबर परदेशात किंवा परगावात राहणे या वयात शक्य नसते, तसेच शहरातून राहण्याच्या जागा कमी असतात ,त्यामुळे असे जेष्ठ नागरिक एकटे रहात असतात अशांना आमचे स्वयंसेवक सर्वतोपरी मदत करतात . तसेच वृद्धाश्रमातील वृद्धांना सुद्धा आमचे स्वयंसेवक मदत करतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सेवा संपूर्णपणे मोफत आहेत. या कामासाठी एकही रुपया सेवेचा मोबदला म्ह्णून किंवा वाहनखर्च म्हणून घेतला जात नाही. अर्थात त्या वृद्धाकडून देणगी स्वरूपात जर रक्कम मिळाली तर आनंदाने त्याचा स्वीकार होतो, पण तशी कोणतीही सक्ती किंवा अपेक्षा केली जात नाही किंवा मिळालेल्या देणगीचा आणि केलेल्या सेवेचा काहीही संबध नसतो .अशा एकट्या दुकट्या जेष्ठ नागरिकांना किराणा माल आणून देणे , भाजी आणून देणे , बँकेची कामे करणे त्यात पैसे काढूंन आणून देणे ,चेक भरणे ,परगावी पैसे पाठविणे , त्यांच्यासाठी लिखाणाचे कामे करणे , त्याचबरोबर त्यांच्यासोबत मनोरंजनात्मक खेळ खेळणे, इत्यादी कामाचा समावेश होते , तसे पेन्शन बाबतची कामे,करणे. त्यांना वृत्तपत्र ,मासिके , किंवा धार्मिक पुस्तके वाचून दाखविणे , त्यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळणे ,कॅरम खेळणे ,त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे ,त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले असल्यास त्यांना सोबत करणे , आयसीयू बाहेर थांबणे इत्यादी कामे केली जातात. तसेच त्यांना त्यांच्या घरच्या परिसरात फिरायला घेऊन जाणे वगैरे कामे हे स्वयंसेवक करीत असतात
कोविड च्या साथीच्या काळात १२०० पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांना लसीच्या केंद्रापर्यंत घेऊन जाणे ,त्यापूर्वी त्यासाठी नंबर लावणे , लसीकरण झालेवर घरापर्यंत पोहचविणे हि कामे सुद्धा या स्वयंसेवक यांनी केली आहे ,तसेच पुणे आणि इतर गावातील वृद्धाश्रमात एकंदर 55 हजार मास्क वाटपाचे काम सुद्धा या स्वयंसेवकांनी केले आहे .
या संस्थेचे एक स्वयंसेवक अविनाश ठाणावाला जे योगासने शिकवू शकतात त्यांनी वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांना योगासने शिकविली आहेत. संस्थेचे लाभार्थी श्री. सुधाकर कुलकर्णी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी ,जेष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी हिंदी आणि मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर केला आहे.आणि तो फेसबुक वर लाईव्ह करून निरनिरळ्या वृद्धश्रमात दाखविला गेला आहे. संस्थेचे स्वयंसेवक निरनिराळ्या वृद्धश्रमात जाऊन त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. गेली 2 वर्षे आमचे स्वयंसेवक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट फोन कसा वापरायचा ?हे शिकवीत असतात, व्हाट्सअँप तसेच निरनिराळी अँप्स कशी वापरायची ते शिकवितात . आपल्या मुलाशी नातवांशी समारोसमोर संपर्क साधित असताना त्यांना झालेला आनंद पाहून आमच्या स्वयंसेवकांना समाधान वाटते ,तसेच कॉम्पुटर कसा वापरायचा, मेल कशी करायची ब्लॉग कसा लिहायचा याचेही शिक्षण देतात . तसेच एटीएम मधून पैसे कशे काढायचे पैसे कसे भरायचे हे सुद्धा जेष्ठ नागरिकांना शिकविले जाते .
या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी ,नोकरी करीत असलेले तरुण ,गृहिणी ,तसेच ज्या जेष्ठ नागरिकांनी प्रकृती अद्याप उत्तम आहे असे जेष्ठ नागरिक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या संस्थेच्या बॅक ऑफिस मध्ये सुमारे 150 पेक्षा जास्त दिव्यांग आपल्या घरी या संस्थेचे कार्यालयीन कामकाज सांभाळतात. या दिव्यांगांना त्यांच्या कामासाठी रोजगार दिला जातो . पुण्यात सुरु झालेली हि चळवळ आता महाराष्ट्रात 23 पेक्षा जास्त गावात आणि महाराष्ट्राबाहेर 45 शहरात तसेच इंग्लड मध्ये 4 शहरात पसरलेली आहे.
www.mayacare.org ही या संस्थेची वेबसाईट आहे यावर संस्थेची संपूर्ण माहिती मिळेल . तसेच संस्थेचा [email protected] हा मेल अड्रेस आहे. तसेच नुकताच या संस्थेचा टोल फ्री 1800-572-1343 नंबर हा सुरू करण्यात आला आहे. आता ह्या सेवा महाराष्ट्रात पुणे, मुंबई कोल्हापूर सातारा ,नागपूर नाशिक, नागपूर ,सांगली ,सोलापूर ,अहमदनगर ,नंदुरबार ,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) बुलढाणा ,अकोला ,जळगाव ,अमरावती, परभणी, जालना ,धुळे ,वर्धा, बीड यवतमाळ आणि चंद्रपूर या शहरात आहे .
जे अद्याप सुदृढ आहेत त्यांनी, स्वयंसेवक व्हा आणि लोकांची सेवा करा आणि या सेवेचा प्रसार करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी याचा लाभ घाव्या आणि संस्था आपल्या स्वयंसेवकांना पेट्रोल खर्च देत असते त्यासाठी पैश्यांची आवश्यकता असते, ज्यांना स्वयंसेवक होऊन लोकांची सेवा करणे शक्य नाही त्यांनी आर्थिक मदत करावी यासाठी संस्थेचे खाते ICICI बँकेत टिळक रोड पुणे येथे आहे खाते नंबर 187501000462 आणि IFSC Code आहे ICIC0001875.
********************************************************************************
3 Sampark Foundation
42 Gandhi Nagar ,
Near Kantai Hall, jilha peth ,
Jalgaon (MS) India
Contact number +91 75884 78624.