Akshaybhasha Kavitaspardha 2023 Winning poems-
Akshaybhasha Kavitaspardha honorably mentioned poems-
The experienced, esteemed judges of the Kavitaspardha 2023-
प्राध्यापिका विनता कुलकर्णी (M.Sc., .M.A., M.S., Ph.D.)
– संख्याशास्त्र, अर्थशास्त्र आणि संगणकशास्त्र विषयांत मास्टर्स पदवी आणि
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट विषयांत पीएच. डी. पदवी प्राप्त
– उत्तर अमेरिकेत सामाजिक, सांस्कृतिक संस्थांमधे २०+ वर्षे
स्वयंसेवाकार्यानुभव:
– संपादक: ‘बृहन्महाराष्ट्र वृत्त’, मासिक प्रकाशन, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका
– ‘रचना’, त्रैमासिक प्रकाशन, महाराष्ट्र मंडळ, शिकागो
‘स्नेहबंध’, त्रैमासिक प्रकाशन, मराठी भाषक मंडळ, टोरांटो कॅनडा
– संचालक मंडळावर महाराष्ट्र फौंडेशन, न्युजर्सी (५ वर्षे)
-अध्यक्ष, (२००८), मराठी भाषिक मंडळ, टोरांटो, कॅनडा (१ वर्ष)
– स्वयंसेवाकार्य: अमेरिकन रेड क्रॉस (सध्या आणि दहा वर्षे) चाईल्ड फाइंड, कॅनडा (२ वर्षे) या संस्थांच्या कार्यात सहभाग
प्रकाशित लेखन: भारत आणि उत्तर अमेरिकेतील विविध नियतकालिकांतून विपुल मराठी ललित लेख, कथा, मान्यवरांवर व्यक्तिवेध, मराठी व इंग्रजी कविता प्रकाशित.
– प्रकाशित पुस्तके: क्षितिज पश्चिमेचे, ठसे आठवांचे, तरंग भवतालचे, अनुवादित कादंबरी- पुस्तकचोर आणि अनुवादित पुस्तक “ब्रेकिंग द हॅविट ऑफ बीइंग यूअरसेल्फ“. याशिवाय, विद्यापीठ पातळीवर, संख्याशास्त्र विषयाची तीन पाठ्यपुस्तके (इंग्रजी भाषेत) प्रकाशित
प्राध्यापिका डॉ. सुजाता अजय महाजन (पूर्वाश्रमी – सुजाता शिरवळकर)
शिक्षण: एम. ए. (मराठी), एम. ए. (भाषाविज्ञान), पीएच. डी. (भाषाविज्ञान)
व्यवसाय: शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे मराठीचे अध्यापन.
प्रकाशित लेखन :
- ‘भावनिका’, ‘आर्त’, ‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’ हे कवितासंग्रह, ‘भावनिका’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त. तर ‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’ या संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, आवानओल, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यासारख्या संस्थांचे पुरस्कार प्राप्त.
- इथेच! याच क्षणात!, ‘शहरातला प्रत्येक’ हे कथासंग्रह. याबरोबरच, ‘बालसाहित्य स्वरूप आणि वाटचाल’ हा समीक्षाग्रंथ, ‘बिंदी’ ही बालकादंबरी, ‘महाकवी कुवेम्पू’ या चरित्रग्रंथाचा मराठी अनुवाद अशी एकूण आठ पुस्तके प्रकाशित.
- अन्य
- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या ‘कुमारभारती’ या पाठ्यपुस्तकाचे संपादन.
- लॉंगमन व सी. आय. एल. एल. यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या इंग्रजी-इंग्रजी-मराठी कोशाचे संपादन.
- महाराष्ट्र शासनाच्या ‘भाषा सल्लागार समिती’(२०१५)ची सदस्य म्हणून कार्यरत.
- प्रातिनिधिक मराठी कवितेच्या अनेक संकलनांमध्ये कवितांची निवड.
- मराठीतील अनेक महत्त्वाच्या मासिकांमधून कथा, कविता, लेख, शोधनिबंध प्रसिद्ध.
- काही कविता इंग्रजी, हिंदी, तेलुगु व उडिया या भाषांमध्ये अनुवादित.
- साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या अंकातून इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध.
- अहमदनगर, औरंगाबाद तसेच नागपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सहभाग.
- साहित्य अकादमीतर्फे आयोजित अनेक कवीसंमेलने, चर्चासत्रे इ. कार्यक्रमांत सहभाग.