नमस्कार, मंडळी.
नूतन वर्षाचे पदार्पण झालेले आहे. मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत. अश्या उत्साही काळात
अक्षयभाषा संस्थेने दर वर्षाच्या सुरवातीला कविता स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.
या वर्षीच्या स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे-
१. कविता पाठवण्याची अंतिम तारीख –फेब्रुवारी १८, २०२३
२. कवितेचा निकाल –फेब्रुवारी २८, २०२३
३. ह्या स्पर्धेत फक्त उत्तर अमेरिकेतील कवी सहभागी होऊ शकतील.
४. कविता मराठी भाषेतील, संपूर्णपणे स्वतःची असावी (अनुवादित नसावी) तसेच ही कविता फेसबुक किंवा इतर सोशल मेडियावर किंवा मासिकांत प्रसिद्ध झालेली नसावी.
५. कविता स्पर्धा प्रवेश विनामूल्य असून ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली आहे. मात्र एका स्पर्धकास एकच कविता पाठवता येईल.
६. कविता Microsoft Word Document या स्वरूपात akshaykathaspardha@gmail.com इथे पाठवावी.
८. कविता कमीत कमी दहा ओळींची आणि जास्ती जास्त ३२ ओळींची असावी.
चारोळ्या, हायकू, खंडकाव्य, महाकाव्य पाठवू नयेत.
९. कवितेसोबत पूर्ण नाव, पत्ता, इमेल आणि फोन नंबर ही माहिती इमेलवर पाठवावी.
१०. कवितेच्या पहिल्या किंवा इतर कुठल्याही पानावर लेखकासंबंधी माहिती नसावी.
तशी माहिती आढळल्यास कविता परत पाठवली जाईल.
११. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.
१२. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या कवितांना
$ १००, $ ७५, $ ५० अशी पारितोषिके दिली जातील.
१३. पारितोषिक प्राप्त आणि काही उल्लेखनीय कविता
अक्षयभाषा वार्षिक ई-अंकात प्रसिद्ध केल्या जातील.
हा अंक वर्षाअखेरीस प्रसिद्ध होईल.
१४. शुद्धलेखन तपासल्यानंतर कविता पाठवावी.
(कवितेसाठी कधीकधी शुद्धलेखनाचे नियम मोडावे लागतात
याची आयोजक आणि परीक्षक यांना जाणीव आहे.)
त्याबाबतीत व्यावसायिक मदत घ्यायची असल्यास या व्यक्तींशी संपर्क करू शकता –
भाग्यश्री बनहट्टी +91 98229 42256 Whatsapp;
प्रा. रुपाली शिंदे +91 99210 47461 Whatsapp
डॉ. वसुधा वैद्य +91 94236 16932 Whatsapp
१५. या स्पर्धेसंबंधी काही प्रश्न किंवा सूचना असल्यास कृपया
akshaykathaspardha@gmail.com इथे संपर्क करावा.
आपण सर्व या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.
***********************************************
येत्या कार्यक्रमाची पुनस्सूचना –
” ज्ञानेश्वरीतील दहा वैज्ञानिक ओव्या “
या विषयावर डॉ. रवीन् थत्ते यांचे भाषण
दिनांक : शनिवार, जानेवारी १४, २०२३
8 am Arizona time
स्थळ : झूम
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/2647972886
No password required. It’s a clickable link.
२०२३ ह्या वर्षी आपल्याला अनेक नवीन पुस्तके
वाचायला सवड मिळो या शुभेच्छा !
सस्नेह,
भाग्यश्री बारलिंगे
अक्षयभाषा
======================================
https://tinyurl.com/mpsm7tah ह्या Youtube channelचे
( विनामूल्य ) सदस्यत्व घेतल्यास अक्षयभाषा कलाकारांनी
सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.
======================================
Akshaybhasha Facebook page:
Please, like & follow https://tinyurl.com/ad6k4jrp
======================================
Akshaybhasha Website: www.akshaybhasha.org
======================================
https://smile.amazon.com/ch/30-0280809
ह्या वेबसाइटवर कोणतीही खरेदी केल्यास ॲमॅझॉनकडून
अक्षयभाषा संस्थेला एक अल्पशी देणगी मिळेल.
======================================
अक्षयभाषा संस्थेला देणगी देण्यासाठी ही लिंक वापरा –
https://www.paypal.com/donate/?hosted_button_id=C24RBP7Z53B84
======================================
जर ‘अक्षयभाषा’च्या ईमेल्स तुम्हांला नको असतील तर
bcbarlingay@gmail.com ह्या ईमेलवर तसे जरूर कळवावे.
===================================