Akshaybhasha Pustak Mohim Sept.2016

Akshaybhasha Bookmark with caption

अक्षयभाषा पुस्तक मोहीम

नमस्कार मंडळी,
१. गणपती उत्सवाच्या उत्साहात भर घालणारी बातमी- टेम्पी पब्लिक लायब्ररीत पाचशे मराठी पुस्तके ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.
फिनिक्सच्या मराठी जनांस पुस्तकांची देणगी देण्याविषयी आवाहन ! लहान-मोठ्यांची, सुस्थितीतील मराठी पुस्तके दिल्यास आभारी राहू. महाराष्ट्र मंडळाच्या गणपती उत्सवाच्या वेळी पुस्तकांची देणगी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येईल. नंतर द्यायची झाल्यास, भाग्यश्री बारलिंगे, प्राजक्ती कुलकर्णी, राजश्री सोमण, वैभवी प्रधान यांच्याकडे पुस्तके देता येतील. पुस्तकांच्या किमतीप्रमाणे (हवी असल्यास) (e -receipt) रसीद देता येईल.
जवळपास अर्धी पुस्तके मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्याकडून मागवली आहेत. पुस्तकांच्या किमतीपेक्षा टपालाचा खर्च जास्त असल्यामुळे मुंबईहून फिनिक्सला येताना जर आपण सगळ्यांनी जमतील तेवढी पुस्तके आणलीत तर मदत होईल. मॅजेस्टिक प्रकाशनाचा आर्थिक व्यवहार “अक्षयभाषा” या संस्थेबरोबर होईल.
२. तसेच लोटस इंडियन स्टोअर ( alma school + baseline ) मध्ये अक्षयभाषा बुक रॅक निर्माण करण्यात आली आहे; तिथे जुनी मासिके, जुने दिवाळी अंक ठेवलेले आहेत. त्यात तुम्ही भर घालू शकाल. जी तुम्हाला परत मिळाली नाही तरी चालतील अशीच मासिके, दिवाळी अंक तिथे ठेवावे.
३. चॅन्डलर सिनिअर सेंटर मध्ये काही मराठी पुस्तके ठेवली आहेत. (त्यांचा उपयोग मर्यादित आहे कारण हे सेंटर फक्त सोमवार ते शुक्रवार आठ ते पाच उघडे असते.) ही पुस्तके पुढे मराठी शाळेच्या खोलीत हलवण्यात येतील.
४. akshaybhasha.org या वेब साईटला जरूर भेट द्या.
पुस्तक मोहिमे विषयी जर काही प्रश्न असल्यास संपर्क साधा या पत्त्यावर- akshaybhasha@cox.net किंवा info@akshaybhasha.org.
गणपती उत्सवा निमित्त शुभेच्छा,
अक्षयभाषा कमिटी.