अक्षयभाषेचे २०२१ च्या पूर्वार्धातील कार्यक्रम

नमस्कार मंडळी,

सहर्ष सादर करीत आहोत अक्षयभाषेचा नवीन उपक्रम –

        • चांदोबातील गोष्टी –  हा मनोरंजक कार्यक्रम म्हणजे लहान मुलांपर्यंत मराठी पोचवण्याचा एक मार्ग. आशा आहे की तुम्हां सगळ्यांना तो आवडेल. तुमच्या सूचना, शेरे, प्रश्न नक्की कळवा.
        • स्त्रीचे व्यक्तिमत्वएक मनोहर पिसारा‘-शतकापुर्वीच्या पंडिता रमाबाई ते आधुनिक जगातील जानकी अम्मल व सालूमरद तिम्मक्का असा आढावा घेणारा हा अभिवाचनांचा दर्जेदार आगळा-वेगळा कार्यक्रम. ही आहे एक वैचारिक करमणूक, कलाकाराला व श्रोत्यांना समृद्ध करणारी! तुमचा या सादरीकरणांवरचा प्रतिसाद लेखक व अभिवाचकांसाठी महत्वाचा राहील.
          • कोरोना आणि स्थित्यंतर’ हे आहे मनोगत फिनीक्सच्या रहिवास्यांचे. तुमच्या भावनांचे, विचारांचे पडसाद या वेगवेगळ्या ललित लेखांमध्ये तुम्हांला उमटलेले दिसतील. हा कार्यक्रम म्हणजे कोरोना काळाची केलेली आवश्यक अशी नोंद आहे. या लेखांविषयी तुमची मते जरूर कळवा.

इतर संस्थांचे महत्वाचे कार्यक्रम

१. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूर – स्त्रियांच्या तीन पिढ्यांमधील अंतर्मुख करणारा संवाद –अंतर्बंध’ – https://www.facebook.com/AbhivyaktiNagpur/ (click on posts).

२. मिळून साऱ्याजणी आणि चांगुलपणाची चळवळ आयोजित ‘विद्या बाळ अध्यासन’ प्रकल्पांतर्गत गावोगावीच्या विचारदुतांबरोबर गप्पा

https://www.facebook.com/saryajani/videos/890489215130993

३. चांगुलपणाच्या चळवळी मार्फत साहित्यातून सांस्कृतिक समृद्धीकडे वाटचाल” या विषयावर सुप्रसिद्ध लेखक-संपादक श्री भानु काळे यांची मुलाखत घेताहेत सौ.शुभांगी मुळे.
https://youtu.be/VHUNlhY0v3k