Kavitaspardha 2023 result

Akshaybhasha Kavitaspardha 2023 Winning poems-

 

Akshaybhasha Kavitaspardha honorably mentioned poems- 

 

kavitaspardha 2023

 

 

 

 

The experienced, esteemed judges of the Kavitaspardha 2023- 

 

प्राध्यापिका विनता कुलकर्णी (M.Sc., .M.A., M.S., Ph.D.)

 संख्याशास्त्र, अर्थशास्त्र आणि संगणकशास्त्र विषयांत मास्टर्स पदवी आणि

इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट विषयांत पीएच. डी. पदवी प्राप्त

–  उत्तर अमेरिकेत सामाजिक, सांस्कृतिक संस्थांमधे २०+ वर्षे

स्वयंसेवाकार्यानुभव:
– संपादक: ‘बृहन्महाराष्ट्र वृत्त’, मासिक प्रकाशन, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका
– ‘रचना’, त्रैमासिक प्रकाशन, महाराष्ट्र मंडळ, शिकागो
‘स्नेहबंध’, त्रैमासिक प्रकाशन, मराठी भाषक मंडळ, टोरांटो कॅनडा
– संचालक मंडळावर महाराष्ट्र फौंडेशन, न्युजर्सी (५ वर्षे)

-अध्यक्ष, (२००८), मराठी भाषिक मंडळ, टोरांटो, कॅनडा (१ वर्ष)
– स्वयंसेवाकार्य: अमेरिकन रेड क्रॉस (सध्या आणि दहा वर्षे) चाईल्ड फाइंड, कॅनडा (२ वर्षे) या संस्थांच्या कार्यात सहभाग

प्रकाशित लेखन:  भारत आणि उत्तर अमेरिकेतील विविध नियतकालिकांतून विपुल मराठी ललित लेख, कथा, मान्यवरांवर व्यक्तिवेध,  मराठी व इंग्रजी कविता प्रकाशित.
 –  प्रकाशित पुस्तके:  क्षितिज पश्चिमेचे, ठसे आठवांचे, तरंग भवतालचे, अनुवादित कादंबरी- पुस्तकचोर आणि अनुवादित पुस्तक “ब्रेकिंग द हॅविट ऑफ बीइंग यूअरसेल्फ. याशिवाय, विद्यापीठ पातळीवर, संख्याशास्त्र विषयाची तीन पाठ्यपुस्तके (इंग्रजी भाषेत) प्रकाशित

 

प्राध्यापिका डॉ. सुजाता अजय महाजन (पूर्वाश्रमी – सुजाता शिरवळकर)

शिक्षण:   एम. ए. (मराठी), एम. ए. (भाषाविज्ञान), पीएच. डी. (भाषाविज्ञान)

व्यवसाय: शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे मराठीचे अध्यापन.

प्रकाशित लेखन :

  • भावनिका’, ‘आर्त’, ‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’ हे कवितासंग्रह, ‘भावनिका’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त. तर ‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’ या संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, आवानओल, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यासारख्या संस्थांचे पुरस्कार प्राप्त.
  • इथेच! याच क्षणात!, ‘शहरातला प्रत्येक’ हे कथासंग्रह. याबरोबरच, ‘बालसाहित्य स्वरूप आणि वाटचाल’ हा समीक्षाग्रंथ, ‘बिंदी’ ही बालकादंबरी, ‘महाकवी कुवेम्पू’ या चरित्रग्रंथाचा मराठी अनुवाद अशी एकूण आठ पुस्तके प्रकाशित.
  • अन्य
  • महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या ‘कुमारभारती’ या पाठ्यपुस्तकाचे संपादन.
  • लॉंगमन व सी. आय. एल. एल. यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या इंग्रजी-इंग्रजी-मराठी कोशाचे संपादन.
  • महाराष्ट्र शासनाच्या ‘भाषा सल्लागार समिती’(२०१५)ची सदस्य म्हणून कार्यरत.
  • प्रातिनिधिक मराठी कवितेच्या अनेक संकलनांमध्ये कवितांची निवड.
  • मराठीतील अनेक महत्त्वाच्या मासिकांमधून कथा, कविता, लेख, शोधनिबंध प्रसिद्ध.
  • काही कविता इंग्रजी, हिंदी, तेलुगु व उडिया या भाषांमध्ये अनुवादित.
  • साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या अंकातून इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध.
  • अहमदनगर, औरंगाबाद तसेच नागपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सहभाग.
  • साहित्य अकादमीतर्फे आयोजित अनेक कवीसंमेलने, चर्चासत्रे इ. कार्यक्रमांत सहभाग.

Akshaybhasha Kavitaspardha 2023

 

नमस्कार, मंडळी.

नूतन वर्षाचे पदार्पण झालेले आहे. मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत. अश्या उत्साही काळात

अक्षयभाषा संस्थेने दर वर्षाच्या सुरवातीला कविता स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.

या वर्षीच्या स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे-

१. कविता पाठवण्याची अंतिम तारीख –फेब्रुवारी १८, २०२३

२. कवितेचा निकाल –फेब्रुवारी २८, २०२३

३. ह्या स्पर्धेत फक्त उत्तर अमेरिकेतील कवी सहभागी होऊ शकतील.

४. कविता मराठी भाषेतील, संपूर्णपणे स्वतःची असावी (अनुवादित नसावी) तसेच ही कविता फेसबुक  किंवा इतर सोशल मेडियावर किंवा मासिकांत प्रसिद्ध झालेली नसावी.

५. कविता स्पर्धा प्रवेश विनामूल्य असून ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली आहे. मात्र एका स्पर्धकास एकच कविता पाठवता येईल.

६. कविता Microsoft Word Document या स्वरूपात akshaykathaspardha@gmail.com इथे पाठवावी.

८. कविता कमीत कमी दहा ओळींची आणि जास्ती जास्त ३२ ओळींची  असावी.

    चारोळ्या, हायकू, खंडकाव्य, महाकाव्य पाठवू नयेत.

९. कवितेसोबत पूर्ण नाव, पत्ता, इमेल आणि फोन नंबर ही माहिती इमेलवर पाठवावी.

१०. कवितेच्या पहिल्या किंवा इतर कुठल्याही पानावर लेखकासंबंधी माहिती नसावी.

      तशी माहिती आढळल्यास कविता परत पाठवली जाईल.

११. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.

१२.  स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या कवितांना

      $ १००, $ ७५, $ ५० अशी पारितोषिके दिली जातील.

१३. पारितोषिक प्राप्त आणि काही उल्लेखनीय कविता

       अक्षयभाषा वार्षिक ई-अंकात प्रसिद्ध केल्या जातील.

       हा अंक वर्षाअखेरीस प्रसिद्ध होईल.

१४. शुद्धलेखन तपासल्यानंतर कविता पाठवावी.

    (कवितेसाठी कधीकधी शुद्धलेखनाचे नियम मोडावे लागतात

    याची आयोजक आणि परीक्षक यांना जाणीव आहे.)

    त्याबाबतीत व्यावसायिक मदत घ्यायची असल्यास या व्यक्तींशी संपर्क करू शकता –

    भाग्यश्री बनहट्टी +91 98229 42256  Whatsapp; 

    प्रा. रुपाली शिंदे +91 99210 47461 Whatsapp 

    डॉ. वसुधा वैद्य +91 94236 16932  Whatsapp 

 १५. या स्पर्धेसंबंधी काही प्रश्न किंवा सूचना असल्यास कृपया

akshaykathaspardha@gmail.com इथे संपर्क करावा.

आपण सर्व या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.

 

***********************************************

येत्या कार्यक्रमाची पुनस्सूचना –

 ” ज्ञानेश्वरीतील दहा वैज्ञानिक ओव्या “

या विषयावर डॉ. रवीन् थत्ते यांचे भाषण
दिनांक : शनिवारजानेवारी १४२०२३
8 am Arizona time
स्थळ : झूम
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/2647972886
No password required. It’s a clickable link.

२०२३ ह्या वर्षी आपल्याला अनेक नवीन पुस्तके

वाचायला सवड मिळो या शुभेच्छा !
सस्नेह,
भाग्यश्री बारलिंगे

अक्षयभाषा

======================================

https://tinyurl.com/mpsm7tah ह्या Youtube channelचे

( विनामूल्य ) सदस्यत्व घेतल्यास अक्षयभाषा कलाकारांनी

सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.

======================================

Akshaybhasha Facebook page:

Please, like & follow https://tinyurl.com/ad6k4jrp

======================================

Akshaybhasha Website: www.akshaybhasha.org

======================================

https://smile.amazon.com/ch/30-0280809

ह्या वेबसाइटवर कोणतीही खरेदी केल्यास ॲमॅझॉनकडून

अक्षयभाषा संस्थेला एक अल्पशी देणगी मिळेल.

======================================

अक्षयभाषा संस्थेला देणगी देण्यासाठी ही लिंक वापरा –

https://www.paypal.com/donate/?hosted_button_id=C24RBP7Z53B84

======================================

जर ‘अक्षयभाषा’च्या ईमेल्स तुम्हांला नको असतील तर

bcbarlingay@gmail.com ह्या ईमेलवर तसे जरूर कळवावे.

===================================

A webinar on heart health by El Camino South asian heart center on Nov 6, 2022

Dear friends,

We, the South Asians, a proud community of highly educated people, are well aware of the existence of premature coronary artery disease

in our community. Each of us has a sad story to tell about the sudden death of a loved one from a heart attack

-the first and the last one !

This is the disease which comes in without knocking on the door.

South Asians have about double the risk of coronary artery disease compared to Europeans and other ethnic groups.
As a community, we must take action against this present and real danger, against this silent killer !
Akshaybhasha organization is bringing you a well-received webinar offered by

El Camino Health’s South Asian Heart Center:

‘A lifetime on meds or a lifestyle of M.E.D.S. ?’

(Meditation, Exercise, Diet, Sleep)

that will help us save our hearts.

Details of the event:

free event presented by –

Ashish Mathur, Co-founder and Executive director
&
Anita Sathe, Chair, Case management
both from the South Asian Heart Center.

On Zoom platform- https://us02web.zoom.us/j/86940302198

Meeting ID: 869 4030 2198

On Sunday, November 6, 2022
at

2 pm PST,

3 pm MST (Phoenix time),

4 pm CST,

5 pm EST

Format- presentation + Q & A session

Webinar registration link –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemmfEaFfNxx2hOfOk2D1lS3f0c3p2ECQ-gUl5zC8ldRWqflQ/viewform?usp=sf_link

Agenda items :
• Understanding India’s twin epidemics: Diabetes and Heart Attacks
• Review South Asian Heart Center’s AIM to Prevent culturally tailored approach
• Review the scientific evidence behind lifestyle as a therapeutic intervention
• Learn about M.E.D.S – the foundation of the Center’s lifestyle methodology       (Meditation, Exercise, Diet, and Sleep)
• Discover your secret sauce to sustainable behavior change

Here are some links for review:
1.       www.southasianheartcenter.org
2.       Our most recent Impact Report
3.       Surgeon General’s message :
4.       Programs at a Glance
5.       Uncover your hidden risks (2 minute video)
6.       Participant Experience (3 minute video)

If you have any questions or concerns, please, write to akshaybhasha2005@gmail.com.

Please, do join this webinar and help spread the word .

Thank you,
With warm regards,
Akshaybhasha organization

https://akshaybhasha.org

A fundraising program for Pallium India on Oct 9, 2022

 



 

 

 

 

Mark your calendar 

for a wonderful Bharatnatyam program

by Silambam, Phoenix

on Sunday 4-7pm, October 9, 2022

at Mesa Arts Center

being sponsored by Akshaybhasha

in collaboration with Sewa International

to support Pallium India, a charitable trust

dedicated to palliative care in India.

             What is palliative care- https://youtu.be/xM7d-YnF4yo

 

What is Palliative care? 

Palliative care is – A new and evolving concept in medicine,

  • a need of the current times due to the ageing population and prolonged lives of the chronically ill.
  • an extra layer of support to the conventional medical care in case of complicated, prolonged illnesses such as cancer, dementia, AIDS, etc
  • To achieve quality of life by relieving health related pain and suffering.

What is Pallium India?

Pallium, India- a charitable trust dedicated to palliative care,

-based in Kerala, founded by Padmashri Dr. Rajgopal in 2003,

– it’s vision is to integrate palliative care with the general health care and make it available all over India.

Why donate to Pallium, India ? – Look at the bigger picture.

-We are going back and forth to our homeland and our loved ones are still there.

– our donations will not be only for the philanthropic reason but also an investment in our own future.

Donate generously to help build a strong base of palliative care in India.

2020 Kathaspardha flipbook cell phone view

2021 kathaspardha flipbook cell phone view

2021 Kathaspardha flipbook monitor view

2020 Kathaspardha flip book monitor view

एकता – अक्षयभाषा कथास्पर्धा २०२०/२१ इ-बुक

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-202…ook-monitor-view/

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-202…ook-monitor-view/

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-2021-e-book/

https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-2020-e-book/

नमस्कार मंडळी,
एकता- अक्षयभाषा कथास्पर्धेचा निकाल जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. उत्तर अमेरिकेतील लेखकांनी या स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !
कथांचे मूल्यांकन विद्युल्लेखा अकलुजकर, प्रकाश लोथे आणि विनता कुलकर्णी  या विद्वान व अनुभवी परिक्षकांनी समर्थपणे हाताळले. विद्युल्लेखा अकलुजकर या एकता मासिकाच्या संपादक -सल्लागार म्हणून व अनेक उत्तम पुस्तकांच्या सिद्धहस्त लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. प्रकाश लोथे हे पारितोषिक विजेती कादंबरी ‘धर्मधुरीण’ व ‘वाटचाल’ हे गाजलेले नाटक ह्यांचे लेखक आणि राष्ट्रपती पदकाने विभूषित चित्रपट ‘कासव’ ह्याचे निर्माते म्हणून ओळखले जातात. विनता कुलकर्णी ह्या उत्तम लेखिका असून बृहन महाराष्ट्र वृत्त (BMM Newsletter) गेली अनेक वर्षे निरलसपणे संपादित करताहेत. तसेच त्यांनी online विश्व मराठी साहित्य संमेलन २०२१ (विदेश विभाग) याचे मानाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची अनेक पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.
या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कथांचे योग्य मूल्यमापन केले त्याबद्दल अक्षयभाषा ही संस्था त्यांची ऋणी आहे. 
एकता मासिक आणि फाउंडेशन यांचे संस्थापक श्री. विनायक गोखले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासाठी आयोजक त्यांचे आभारी आहेत.

कथास्पर्धा २०२१ चा निकाल खालील प्रमाणे –

विजेत्या कथा –

क्रमांक १- मावळतीचे रंग – संजय गोखले

क्रमांक २- वाल्या कोळ्याची बायको – पद्मिनी दिवेकर

क्रमांक ३- मंगळ – गायत्री गद्रे

उल्लेखनीय कथा –

ससा भानोशी आला – प्रियदर्शन मनोहर

तुझीमाझी गोष्ट – सुधा गोरे

तसदी बद्दल क्षमस्व – कौस्तुभ एरंडे

निरभ्र – स्मिता शानभाग-माथूर

नवजन्म – प्राजक्ता पाडगांवकर

जगण्याला लय आली – श्रध्दा भट

चौकट – अनु महाबळ

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !

येत्या काही आठवड्यात वरील सर्व कथा इ-बुकात प्रसिद्ध होतील. विजेत्या कथांचे अक्षयभाषा कलाकारांकडून कॅन्सस सिटी मधील उदयन आपटे यांच्या ‘मराठी अमेरिकन रेडिओ’ ह्या पॅाडकास्टवर भाववाचन केले जाईल.

पुढच्या कथास्पर्धांनाही उत्तर अमेरिकेतील लेखकांकडून असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहील अशी आशा आहे !

आपल्या प्रिय देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन !

आयोजक
अक्षयभाषा