https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-202…ook-monitor-view/
https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-202…ook-monitor-view/
https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-2021-e-book/
https://akshaybhasha.org/3d-flip-book/kathaspardha-2020-e-book/
नमस्कार मंडळी,
एकता- अक्षयभाषा कथास्पर्धेचा निकाल जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. उत्तर अमेरिकेतील लेखकांनी या स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !
कथांचे मूल्यांकन विद्युल्लेखा अकलुजकर, प्रकाश लोथे आणि विनता कुलकर्णी या विद्वान व अनुभवी परिक्षकांनी समर्थपणे हाताळले. विद्युल्लेखा अकलुजकर या एकता मासिकाच्या संपादक -सल्लागार म्हणून व अनेक उत्तम पुस्तकांच्या सिद्धहस्त लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. प्रकाश लोथे हे पारितोषिक विजेती कादंबरी ‘धर्मधुरीण’ व ‘वाटचाल’ हे गाजलेले नाटक ह्यांचे लेखक आणि राष्ट्रपती पदकाने विभूषित चित्रपट ‘कासव’ ह्याचे निर्माते म्हणून ओळखले जातात. विनता कुलकर्णी ह्या उत्तम लेखिका असून बृहन महाराष्ट्र वृत्त (BMM Newsletter) गेली अनेक वर्षे निरलसपणे संपादित करताहेत. तसेच त्यांनी online विश्व मराठी साहित्य संमेलन २०२१ (विदेश विभाग) याचे मानाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची अनेक पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.
या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कथांचे योग्य मूल्यमापन केले त्याबद्दल अक्षयभाषा ही संस्था त्यांची ऋणी आहे. एकता मासिक आणि फाउंडेशन यांचे संस्थापक श्री. विनायक गोखले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासाठी आयोजक त्यांचे आभारी आहेत.
कथास्पर्धा २०२१ चा निकाल खालील प्रमाणे –
विजेत्या कथा –
क्रमांक १- मावळतीचे रंग – संजय गोखले
क्रमांक २- वाल्या कोळ्याची बायको – पद्मिनी दिवेकर
क्रमांक ३- मंगळ – गायत्री गद्रे
उल्लेखनीय कथा –
ससा भानोशी आला – प्रियदर्शन मनोहर
तसदी बद्दल क्षमस्व – कौस्तुभ एरंडे
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !
येत्या काही आठवड्यात वरील सर्व कथा इ-बुकात प्रसिद्ध होतील. विजेत्या कथांचे अक्षयभाषा कलाकारांकडून कॅन्सस सिटी मधील उदयन आपटे यांच्या ‘मराठी अमेरिकन रेडिओ’ ह्या पॅाडकास्टवर भाववाचन केले जाईल.
पुढच्या कथास्पर्धांनाही उत्तर अमेरिकेतील लेखकांकडून असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहील अशी आशा आहे !
आपल्या प्रिय देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन !
आयोजक
अक्षयभाषा