हराळीतील सूर्योदय
भारतातील (आणि एकूण जगातीलच) वृद्धांची संख्या वाढते आहे. त्या बरोबरच वृद्धापकाळी भेडसावणाऱ्या समस्या सामाजिक पातळीवर जाणवू लागल्या आहेत. तसेच वैद्यकीय ज्ञानातील प्रगतीमुळे प्रदीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आजकाल बराच काळ जगू शकतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा दर्जा उंचावणं हे वैद्यकीय सेवेच्या कक्षेत आणणं म्हणजे पॅलिएटिव्ह केयर किंवा क्लेशशमन सेवा.
क्लेशशमन सेवा म्हणजे काय ? (Palliversation video)
जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) क्लेशशमन सेवा
ही अधिकृत रित्या मान्य करून पुढील व्याख्येचे प्रतिपादन केले-
“असाध्य आजार असणाऱ्या रोग्याची सक्रिय संपूर्ण सेवा. या सेवेत वेदना आणि इतर यातनापूर्ण लक्षणांचे नियंत्रण करणे तसेच सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक समस्यांचे निराकरण करणे या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. क्लेशशमन सेवेचे उद्दिष्ट रोगी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा दर्जा शक्य तेव्हढा उंचावणे.”
पुढील तत्त्वे जागतिक आरोग्य संस्थेने अधोरेखित केली आहेत –
१. जीवन हे निर्विवादपणे महत्त्वाचे आहे आणि मृत्यू हा जीवनाचाच एक नैसर्गिक भाग आहे.
२. क्लेशशमन सेवेमुळे मृत्यूची प्रक्रिया जलद किंवा संथ होत नाही.
३. क्लेशशमन सेवा नावाप्रमाणेच वेदना व इतर यातना यांचे शमन करते.
४. या सेवेत मानसिक व आध्यात्मिक पैलू पण अंतर्भूत आहेत.
५. या सेवेमुळे आजारी व्यक्ती शेवट पर्यंत जास्तीत जास्त क्रियाशील आयुष्य जगू शकते.
६. प्रदीर्घ, गंभीर आजारात आणि आजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सेवेमुळे कुटुंबालाही आधार मिळतो.
नंदुरबार येथील इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशनसाठी काम करणाऱ्या डॉ. अशिता सिंग यांच्या IAPC Journal मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार –
The Palliative Care Approach: Integration an Imperative
https://www.palliativecare.in/the-palliative-care-approach-integration-an-imperative/
“बिनसरकारी किंवा खासगी वैद्यकीय सेवा ही भारतात ठिकठिकाणी उपलब्ध आहे. पण खेड्यातील गरिबांना ती परवडत नाही. या उलट ते सार्वजनिक सरकारी आरोग्य केंद्रे आणि इस्पितळे मोठ्या संख्येने वापरताना दिसतात. जर ही अतिशय आवश्यक अशी सेवा सार्वजनिक वैद्यकीय सेवेतून दिली नाही तर बहुतांशी जनता या महत्वाच्या लाभापासून वंचित राहील.
दोन हजार सतरा सालच्या ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध ब्रिटीश वैद्यकीय जर्नलप्रमाणे जगातील प्रदीर्घ गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांपैकी एक कोटी म्हणजे एक षष्ठांश लोक भारतात राहतात. शहरी आणि ग्रामीण भागातील, खास करून उत्तर भारतातील, क्लेशशमन सेवेच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. ग्रामीण भागात आरोग्यविषयीचे अज्ञान, गरिबी आणि उच्चतर वैद्यकीय सेवेपर्यंत पोचू न शकणे या अडचणींमुळे तिथला, जीवन मर्यादित करणाऱ्या रोगांपासून ग्रासलेला प्रातिनिधिक रोगी हा अगदी वेगळा दिसतो. या उलट ज्या भागात रोगनिवारक उपचार सहज उपलब्ध आहेत, रोगाचे प्राथमिक स्थितीतच निदान होते,योग्य उपचार त्वरित चालू केले जातात, आणि त्यामुळे बहुतांशी लोकांना दिलेले उपचार लागू पडतात आणि म्हणून त्यांचे सुधार-अनुमानसुद्धा (prognosis) चांगले असते, तिथला प्रातिनिधिक रोगी अर्थातच वेगळा दिसतो.
बंगरूळच्या क्लेशशमन सेवा देणाऱ्या डॉ. स्टॅनली मॅकॅडेन यांनी उत्तर भारतातील कर्करोगग्रस्त खेड्यांविषयी खालील उद्गार काढले आहेत- ” कर्करोगाला या खेड्यांमध्ये गरिबांच्या शरीराची धूळधाण करायला अनिर्बंध आणि बेलगाम अशी मुभा दिली गेली आहे.” यावरून शहरांपेक्षा ग्रामीण भागात क्लेशशमन सेवेची जी गरज आहे ती किती तीव्र, व्यापक आणि मोठ्या प्रमाणात आहे ह्याची कल्पना करणे कठीण नाही.
ज्या भागांमध्ये अजूनही निरक्षरता, अज्ञान, गरिबी इत्यादी आव्हाने ठाण मांडून बसलेली आहेत त्या भागांमध्ये सर्वसमावेशक अशी क्लेशशमन सेवा उपलब्ध झाली तर तत्कालीन वैद्यकीय सेवेत असलेले दोष कमी करता येतील; सार्वजनिक आरोग्य सेवेला पडलेली छिद्रं किंवा भगदाडं बुजवता येतील आणि त्यामुळे एकूणच स्थानिक लोकांच्या जगण्याचा दर्जा वाढेल.”
यावरून ग्रामीण भागात या प्रकारच्या सेवेची किती गरज आहे हे दिसून येते.
वरील सर्व मुद्दे ध्यानात घेऊन ज्ञानप्रबोधिनीच्या छत्राखाली सोलापूर जिल्ह्यातील हराळी येथे ग्रामीण क्लेशशमन सेवेचा (Rural Maharashtra palliative care) उपक्रम दसऱ्याच्या मुहूर्तावर २०२३ मध्ये सुरु केला आहे.
Rural Maharashtra palliative care plan of action-
Phase 1– survey of the village population regarding the number of palliative care patients in the village communities with the help of ASHA workers,
Phase 2- identifying volunteers, social workers, nurses and MBBS/MD doctors for home based palliative care services;
Phase 3– training the above people using pallium India academic programs,
Phase 4- Putting together the essential medical gadgets such as BP machine, thermometer, pulse oximeter, a measuring tape, weighing balance, acucheck machine, hot & cold packs, wedge pillows and then starting home visits as a team – a doctor, a nurse, a SW.
Phase 5- discussing patients with a doctor in person once a week at least and on telehealth as needed.
Essential medication list for hospice & Palliative care-
Palliative care Resources-
IAPC’s palliative care course-
https://www.palliativecare.in/iapcs-certificate-course-in-palliative-care-for-volunteers-vccpc/
IAHPC-
https://www.palliativecare.in/iapcs-certificate-course-in-palliative-care-for-volunteers-vccpc/
Pallium India-
elicit-basic-living-will-and-instructions-
Advanced care planning – https://palliumindia.org/2020/04/
Article on Volunteership-