Living will लिविंग विल या पोस्टवर संपूर्ण देशातून आलेल्या सकारात्मक प्रतिसादांसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार!
वेगवेगळ्या व्यक्तींनी फोन करून किंवा मेसेज पाठवून काही शंका विचारल्या आहेत. यात एक महत्वाचा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा की Living will स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज करायची गरज नाही. मात्र आपल्या मुलांना नातेवाईकांना आणि मित्रांना लिविंग विल केले आहे माहिती देणे आवश्यक आहे. पुण्यात ज्येष्ठ समाजसेविका विद्याताई बाळ इन्टेन्सिव्ह केअर क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ डॉक्टर शिरीष प्रयाग सोशो लीगल प्रॅक्टिस यामध्ये तज्ञ असणारे वकील असीम सरोदे आणि वृद्ध कल्याण आणि समाजसेवा या क्षेत्रात काम माझ्यासारख्या काही समविचारी व्यक्तींनी मिळून लिविंग विल च्या जागृतीसाठी पुणे, मुंबई ,नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी विविध चर्चासत्रे घेतली होती त्या अनुभवावरून या विषयावर एक डॉक्युमेंट्री तयार केली तर सगळ्यांना मार्गदर्शक होईल असे वाटल्यावरून ए रमा सरोदे सहयोग ट्रस्ट यांनी ‘सुखांताचा वाटाड्या’ या नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे. या विषयाचा सर्व बाजूने विचार करून डॉक्युमेंट्री तयार केली आहे. या डॉक्युमेंट्रीची लिंक आपल्या माहितीसाठी पाठवत आहे ज्यांनी ज्यांनी हा मेसेज पाहिला किंवा फॉरवर्ड केला त्या सर्वांना मनापासून विनंती की त्यांनी ही लिंक फॉरवर्ड करावी म्हणजे अनेक व्यक्तींना त्याचा उपयोग होईल. अधिक माहितीसाठी
*’आपल्यासाठी आपणच* आणि *आनंद स्वर ज्येष्ठांसाठी* ही माझी दोन पुस्तके जरुर वाचावीत.
आपली नम्र,
डॉक्टर रोहिणी पटवर्धन.