BMM Uttarrang initiative- 2024- मुलं परदेशी, आईवडील मायदेशी -Transnational caregiving

https://youtu.be/LJACQVTJG5g  

https://youtu.be/Wn1vFegIcCQ 

https://youtu.be/g4oODK-Mu5c

https://youtu.be/kf2qV-UWVp4

 

या व्हिडिओतील वक्त्यांशी संवाद साधायचा असेल तर खालील इमेल पत्ते वापरावेत –

[email protected],

[email protected]

 

काही महत्त्वाच्या लिंक्स-

Rohini tai’s Living will article- 

https://wp.me/p64qsw-Vn

 

Video-सुखान्ताचा वाटाड्या 

https://wp.me/p64qsw-Vp

 

 

A video on Living Will

 

Living will लिविंग विल या पोस्टवर संपूर्ण देशातून आलेल्या सकारात्मक प्रतिसादांसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार!
वेगवेगळ्या व्यक्तींनी फोन करून किंवा मेसेज पाठवून काही शंका विचारल्या आहेत. यात एक महत्वाचा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा की Living will स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज करायची गरज नाही. मात्र आपल्या मुलांना नातेवाईकांना आणि मित्रांना लिविंग विल केले आहे माहिती देणे आवश्यक आहे. पुण्यात ज्येष्ठ समाजसेविका विद्याताई बाळ इन्टेन्सिव्ह केअर क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ डॉक्टर शिरीष प्रयाग सोशो लीगल प्रॅक्टिस यामध्ये तज्ञ असणारे वकील असीम सरोदे आणि वृद्ध कल्याण आणि समाजसेवा या क्षेत्रात काम माझ्यासारख्या काही समविचारी व्यक्तींनी मिळून लिविंग विल च्या जागृतीसाठी पुणे, मुंबई ,नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी विविध चर्चासत्रे घेतली होती त्या अनुभवावरून या विषयावर एक डॉक्युमेंट्री तयार केली तर सगळ्यांना मार्गदर्शक होईल असे वाटल्यावरून ए रमा सरोदे सहयोग ट्रस्ट यांनी ‘सुखांताचा वाटाड्या’ या नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे. या विषयाचा सर्व बाजूने विचार करून डॉक्युमेंट्री तयार केली आहे. या डॉक्युमेंट्रीची लिंक आपल्या माहितीसाठी पाठवत आहे ज्यांनी ज्यांनी हा मेसेज पाहिला किंवा फॉरवर्ड केला त्या सर्वांना मनापासून विनंती की त्यांनी ही लिंक फॉरवर्ड करावी म्हणजे अनेक व्यक्तींना त्याचा उपयोग होईल. अधिक माहितीसाठी
*’आपल्यासाठी आपणच* आणि *आनंद स्वर ज्येष्ठांसाठी* ही माझी दोन पुस्तके जरुर वाचावीत.
आपली नम्र,
डॉक्टर रोहिणी पटवर्धन.

वैद्यकीय इच्छापत्र (Living Will )

*वैद्यकीय इच्छापत्र*

*(Living Will )*

-डॉ. रोहिणी पटवर्धन, पूर्व प्रसिद्धी 17 मे 2014 लोकसत्ता चतुरंग  पुरवणी

मृत्युपत्र हे संपत्तीची वाटणी करणारं असतं, मात्र वैद्यकीय इच्छापत्राद्वारा

1) माझ्या शरीराचं काय करायचं, 2) मला व्हेन्टिलेटरवर ठेवावं का?

3) किती दिवस ठेवायचं?

4)  माझ्या आजारपणावर किती खर्च करायचा,

5) शरीर वा अवयव दान करायचे का?

यांसारख्या इच्छा लिहून ठेवता येतात.

अठरा वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी   ‘बंध-अनुबंध’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका कमल पाध्ये एकटय़ाच राहत होत्या. डॉ. रोहिणी पटवर्धन आणि प्रमोदिनी वडके-कवळे त्यांची काळजी घेत असत.

एक दिवस त्यांनी आपले डॉक्टर सुभाष काळे व या दोघींना घरी बोलावलं व सांगितले,

*”हे बघा डॉ.काळे माझ्यावर उपचार करतात. तुम्ही दोघी माझी काळजी घेता. इथून पुढे जर मी आजारी पडले आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन तर तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी तुम्हा सर्वासमक्ष स्वेच्छेने माझा निर्णय जाहीर करीत आहे!”*

*’वैद्यकीय इच्छापत्रा’च्या संकल्पनेची मुळं वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या मनांत इथेच रुजली* आणि पुढे त्यांनी त्यांच्या प्रसाराचं कार्य सुरू केलं.

*’लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’* ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत प्रचलित असली तरी भारतात मात्र अजून म्हणावा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. पण बदलत्या काळानुसार आज ‘वैद्यकीय इच्छापत्रा’ची निकड भासू लागली आहे हे निश्चित!

*वस्तुत: ही संकल्पना अद्याप कायद्याच्या चौकटीत नसली तरी  ती एक विचारांची दिशा आहे.*

‘माझे वा माझ्या शरीराचे हाल होऊ नयेत, माझ्या कुटुंबियांना निर्णय घेण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये. त्यांच्यावर महागडय़ा उपचारांचा ताण पडू नये,’ या भूमिकेतून वृद्ध आपली इच्छा या ‘लिव्हिंग विल’ द्वारे व्यक्त करू शकतात.

आपलं शरीर व तब्येत हीसुद्धा एक प्रकारे आपली मालमत्ताच नसते का? मग त्यासंबंधी निर्णय निदान भविष्यकाळातील वैद्यकीय उपचारांबाबतचे आपले आपणच घ्यायला नको का? एखाद्याला बिछान्याला खिळून जगायचं नसेल किंवा कृत्रिम वैद्यकीय उपचार करून घेऊन जिवंत राहायचं नसेल, पण असे निर्णय घेण्यास तो समर्थ नसेल तर आपल्या प्रकृतीसंदर्भात कोणते उपचार केले जावेत वा जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ अर्थात ‘वैद्यकीय इच्छापत्र’! या ‘लिव्हिंग विल’मध्ये आयुर्मर्यादा वाढवणारे कोणतेही उपचार उदा. नळीने अन्न देणं, व्हेन्टिलेटरवर ठेवणं वगैरे करू नयेत असे स्पष्ट निर्देश करता येतात. तसेच देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान यांसारख्या इच्छांचाही उल्लेख करता येतो. मात्र आपले फॅमेली डॉक्टर आणि कुटुंबियांशी नीट चर्चा करूनच हे इच्छापत्र बनवायला हवे. इतकं सगळं करूनही रुग्णालयातील आपल्या आई वडिलांच्या बाबतीत काय करायचं, हा निर्णय शेवटी मुलांकडे रहातोच. वृद्धांसाठी आपली इच्छा व्यक्त करण्याचा फक्त हा एक मार्ग आहे.

आपल्या शरीरावरील *उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचं ते ‘लिव्हिंग विल’ आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे असं लिहून त्यावर डॉक्टर सही करतात. त्याचबरोबर पती अथवा पत्नी तसंच मुलं व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सह्या घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावं लागतं. हे नोटराईज केल्यामुळे ज्येष्ठांची तशी इच्छा होती हे स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर या इच्छापत्राच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या लागतात.

*फक्त हे इच्छापत्र करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाची चर्चा पती-पत्नी, मुलं, डॉक्टर व सुहृद यांच्याबरोबर अवश्य करावी. तरच या इच्छापत्रातील इच्छांची पूर्तता होण्याची खूप शक्यता असते.*

”अर्थात तरीसुद्धा अनेक वेळा समोर मृत्यू दिसू लागताच तोंडाने कितीही निरवानिरवीची भाषा केली तरी रुग्ण उपचार सुरू ठेवायला सांगतात. व जोपर्यंत रुग्ण आपली इच्छा व्यक्त करण्याच्या परिस्थितीत असतो तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसारच उपचार केले जातात. अनेक वेळा रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल तरी भावनेच्या भरात नातलगच रुग्णास उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरतात व ‘लिव्हिंग विल’ला विरोध करतात. एक डॉक्टर म्हणून नातलगांच्या मताचा आदर केला जातो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाही.’

अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर असणारे व ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करणारे डॉ. दिलीप देवधर ‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती सांगतात. ‘लिव्हिंग विल’ अमलात आणताना एक डॉक्टर म्हणून आमचे काही निकष असतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचं वय ७५ च्या वर असेल तरच हा निर्णय घेतला जातो. त्यातही आम्ही डॉक्टर रुग्णावरील उपचार एकदम बंद करत नाही.

*मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असेल तर साधारणपणे ७२ तासांत व जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसांत शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ लागतं. जर तसं झालं नाही तर रुग्णाचे जवळचे नातलग, फॅमिली डॉक्टर, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असे सर्व जण एकत्र बसून चर्चा करतात व त्यानंतरच रुग्णाने शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असा निर्णय घेतला जातो. अर्थात अशा वेळी रुग्णाने स्वत: जर असं वैद्यकीय इच्छापत्र केलं असेल तर सर्वानाच हा कठीण निर्णय घेणं सोपं जातं व जवळच्या नातलगांना अपराधीभाव येत नाहीत.*

सर्वसाधारणपणे डॉक्टरांचा अनुभव असा आहे की मध्यमवर्गीय माणसं भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाच्या उपचारांसाठी भरमसाट खर्च करतात. वेळेला जमीनजुमला, दागदागिनेसुद्धा विकतात. भारी व्याजाने कर्ज उचलतात. त्यांची पुढची दहा-पंधरा वर्ष कर्जफेडीतच जातात व ज्या रुग्णासाठी ते आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढतात तो रुग्णही हाताला लागत नाही व निराशा पदरी पडते. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर ते कुटुंब मोठय़ा संकटातून वाचू शकतं.

आज माणसाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे आर्थिक गणितं साफ बदलली आहेत. वैद्यकीय खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याने जबाबदारी घेऊन रुग्णाला त्याच्या परिस्थितीनुसार सल्ला देणारे डॉक्टर आता राहिले नाहीत. हल्लीची तरुण पिढी व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी असते. त्यामुळे परावलंबी रुग्णाला सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. बरेच वेळा अशा मृत्युशय्येवरील रुग्णाला ठरावीक मुदतीपुढे हॉस्पिटलही ठेवून घेत नाहीत. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर केवळ कृत्रिम यंत्रणांवर जिवंत असणाऱ्या रुग्णाच्या नातलगांना कटू निर्णय घेण्यासाठी ‘लिव्हिंग विल’ हा फार मोठा दिलासा ठरू शकतो.

परदेशस्थ मुलं तिथल्या नियमांप्रमाणे इथेही उपचारांची दिशा ठरवण्याचा आग्रह धरतात. त्यांना इथल्या अडचणी व मर्यादा लक्षात येत नाहीत व त्याचा इथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व जवळचे नातलग यांना खूप त्रास होतो. आई-वडील तब्येतीने धडधाकट असतानाच परदेशस्थ मुलं, इथे ज्येष्ठांची काळजी घेणारे दोन नातलग आणि डॉक्टर यांनी एकत्र बैठक घेऊन पुढील काळात ज्येष्ठ आजारी पडल्यास त्यांच्या उपचारांची दिशा, व्याप्ती व मर्यादा यांचा साकल्याने विचार करून असं ‘वैद्यकीय इच्छापत्र’ केलं तर ते सर्वानाच खूप सोयीचं होईल. अर्थात त्यासाठी निरोगी वृद्धांनी एखाद्या तरी डॉक्टरशी सतत संपर्कात राहून नियमित वैद्यकीय चाचण्या कराव्यात.

‘सनवर्ल्ड’वरील याच सदरातील लेखानंतर रोहिणी पटवर्धन त्यांना अनेक फोन आले. त्यांतील एका ज्येष्ठाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते सांगत होते, ”मी युद्धनीतितज्ज्ञ म्हणून नोकरीनिमित्त सतत फिरतीवर होतो. सतत बाहेरगावी राहिल्यामुळे नातलगांशी माझा संबंध नाही. मला मुलं नाहीत. पत्नी हयात नाही. मी एकटाच आहे. मी तुमच्याकडे रोख रक्कम जमा करेन. त्यांतून खर्च भागेल एवढेच वैद्यकीय उपचार तुम्ही माझ्यावर करा. मी हे लेखी स्वरूपात दिलं तर तुम्ही मला प्रवेश देणार की नाही?”

*’वैद्यकीय इच्छापत्र’ अशा एकटय़ा अविवाहित, विनापत्य, मुलं असूनही जवळ नाहीत वा ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही त्यांच्यासाठी वरदान आहे.*

तसंच असाध्य व्याधींनी पीडित ज्यावर औषध व उपचार उपलब्ध नाहीत अशांसाठीही ते उपयुक्त आहे.

आयुष्यभर ज्या मुलांवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्यासाठी कष्ट उपसतो, त्यांच्यावर अनावश्यक उपचाराचं ओझं लादणं वा त्यांना अप्रिय निर्णय घ्यायला लावणं यापेक्षा व्यावहारिक विचार करून ‘लिव्हिंग विल’ चा पर्याय स्वीकारणं अधिक योग्य आहे नाही का?    

वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी  संपर्क साधा –                    

डॉ. रोहिणी पटवर्धन – ९०२८६६४३३३   

लिव्हिंग विल वा वैद्यकीय इच्छापत्र नमुना

मी, …… जर कोणत्याही आजारामुळे अथवा अपघातामुळे माझ्या उपचारासंबंधी निर्णय घेण्यास असमर्थ झालो, तर निम्निलिखित सूचनांचे  काटेकोरपणे पालन व्हावे, अशी माझी इच्छा आहे.

     सूचना –

ज्यामुळे पुन्हा अर्थपूर्ण वा सर्वसामान्य ((Normal) जीवन अशक्य होईल, किंवा उपचार करूनही सहा महिन्यांच्या आत मृत्यू संभवेल, अथवा कायमची बेशुद्धावस्था (unconsciousness and/or brain death) अशी माझी स्थिती झाल्यास.

‘ मला रुग्णालयात ठेवू नये, तसेच भरपाई होऊ शकणाऱ्या आरोग्यविमा रकमेपेक्षा जास्त खर्च करू नये.

‘ मेंदू मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केल्यास माझे जीवन लांबविणारा कोणताही उपचार करू नये. उदा. शस्त्रक्रिया, कृत्रिम श्वसन (ventilator , life support), तसेच डायलिसिस, औषधे, रक्त/रक्तजन्य पदार्थ तसेच कृत्रिमरित्या अन्नपाणी देऊ नये.

‘ मला वेदना होत असल्यास वेदनाशामके द्यावीत. तसेच मी आक्रमक/हिंसक झाल्यास शांत करण्यासाठी आवश्यक ते उपचार जरूर करावेत.

   माझी काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती तसेच संबंधित डॉक्टर यांच्यावर अवघड निर्णय घेण्यासाठी जबाबदारी देऊ नये व त्यांची अप्रतिष्ठा होऊ नये या हेतूने हे इच्छापत्र मी उत्तम मानसिक स्थिती असताना व परिणामांचा काळजीपूर्वक विचार करून लिहीत आहे.

या इच्छापत्रासंबंधी निर्णय घेण्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मी खालील व्यक्तींना देत आहे.

१)………………….

२)……………..

                                                           स्वाक्षरी

                                                         ……………..

हा वैद्यकीय इच्छापत्राचा फक्त नमुना आहे. त्यातील कोणतेही मुद्दे तुम्ही कमी जास्त करू शकता. मृत्युपश्चात अवयवदानापासून ते अंत्यविधीसाठीच्या खर्चापर्यंत अनेक मुद्दय़ांचा यात समावेश करता येतो.

इच्छापत्र करताना आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचे हे इच्छापत्र आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते.

* त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे, असे लिहून त्यावर डॉक्टर सही करतात.

* या वेळी पती अथवा पत्नी तसेच मुले व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सह्य़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावे लागते.

* त्यानंतर त्याच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या.

हा लेखी दस्तऐवज असल्याने कायद्याच्या दृष्टिकोनातूनही तो ग्राह्य़ धरला जातो.

आपल्या परिचयात किंवा आजूबाजूला वृद्धांसाठी विशेष, वेगळं  कार्य करणाऱ्या विशेषत: मुंबई, पुणे परिसराबाहेरच्या संस्था असल्यास आपण आम्हाला कळवू शकता.

आमचा पत्ता- लोकसत्ता, चतुरंग, प्लॉट नं. ई.एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई ४०० ७१०.

ईमेल[email protected] किंवा [email protected]

Palliative care in Rural Maharashtra

हराळीतील सूर्योदय

भारतातील (आणि एकूण जगातीलच) वृद्धांची संख्या वाढते आहे. त्या बरोबरच वृद्धापकाळी भेडसावणाऱ्या समस्या सामाजिक पातळीवर जाणवू लागल्या आहेत. तसेच वैद्यकीय ज्ञानातील प्रगतीमुळे प्रदीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आजकाल बराच काळ जगू शकतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा दर्जा उंचावणं हे वैद्यकीय सेवेच्या कक्षेत आणणं म्हणजे पॅलिएटिव्ह केयर किंवा क्लेशशमन सेवा.

क्लेशशमन सेवा म्हणजे काय ? (Palliversation video)

https://youtu.be/uBufnmcXYbg

 जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) क्लेशशमन सेवा

ही अधिकृत रित्या मान्य करून पुढील व्याख्येचे प्रतिपादन केले-

“असाध्य आजार असणाऱ्या रोग्याची सक्रिय संपूर्ण सेवा. या सेवेत वेदना आणि इतर यातनापूर्ण लक्षणांचे नियंत्रण करणे तसेच सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक समस्यांचे निराकरण करणे या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत.  क्लेशशमन सेवेचे उद्दिष्ट रोगी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा दर्जा शक्य तेव्हढा उंचावणे.”

पुढील तत्त्वे जागतिक आरोग्य संस्थेने अधोरेखित केली आहेत –

१. जीवन हे निर्विवादपणे महत्त्वाचे आहे आणि मृत्यू हा जीवनाचाच एक नैसर्गिक भाग आहे.

२. क्लेशशमन सेवेमुळे मृत्यूची प्रक्रिया जलद किंवा संथ होत नाही.

३. क्लेशशमन सेवा नावाप्रमाणेच वेदना व इतर यातना यांचे शमन करते.

४. या सेवेत मानसिक व आध्यात्मिक पैलू पण अंतर्भूत आहेत.

५. या सेवेमुळे आजारी व्यक्ती शेवट पर्यंत जास्तीत जास्त क्रियाशील आयुष्य जगू शकते.

६. प्रदीर्घ, गंभीर आजारात आणि आजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सेवेमुळे कुटुंबालाही आधार मिळतो.

नंदुरबार येथील इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशनसाठी काम करणाऱ्या डॉ. अशिता सिंग यांच्या IAPC Journal मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार –

The Palliative Care Approach: Integration an Imperative

https://www.palliativecare.in/the-palliative-care-approach-integration-an-imperative/

“बिनसरकारी किंवा खासगी वैद्यकीय सेवा ही भारतात ठिकठिकाणी उपलब्ध आहे. पण खेड्यातील गरिबांना ती परवडत नाही. या उलट ते सार्वजनिक सरकारी आरोग्य केंद्रे आणि इस्पितळे मोठ्या संख्येने वापरताना दिसतात. जर ही अतिशय आवश्यक अशी सेवा सार्वजनिक वैद्यकीय सेवेतून दिली नाही तर बहुतांशी जनता या महत्वाच्या लाभापासून वंचित राहील.

दोन हजार  सतरा सालच्या ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध ब्रिटीश वैद्यकीय जर्नलप्रमाणे जगातील प्रदीर्घ गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांपैकी एक कोटी म्हणजे एक षष्ठांश लोक भारतात राहतात. शहरी आणि ग्रामीण भागातील, खास करून उत्तर भारतातील, क्लेशशमन सेवेच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. ग्रामीण भागात आरोग्यविषयीचे अज्ञान, गरिबी आणि उच्चतर वैद्यकीय सेवेपर्यंत पोचू न शकणे या अडचणींमुळे तिथला, जीवन मर्यादित करणाऱ्या रोगांपासून ग्रासलेला प्रातिनिधिक रोगी हा अगदी वेगळा दिसतो. या उलट ज्या भागात रोगनिवारक उपचार सहज उपलब्ध आहेत, रोगाचे प्राथमिक स्थितीतच निदान होते,योग्य उपचार त्वरित चालू केले जातात, आणि त्यामुळे बहुतांशी लोकांना दिलेले उपचार लागू पडतात आणि म्हणून त्यांचे सुधार-अनुमानसुद्धा (prognosis) चांगले असते, तिथला प्रातिनिधिक रोगी अर्थातच वेगळा दिसतो.

बंगरूळच्या क्लेशशमन सेवा देणाऱ्या डॉ. स्टॅनली मॅकॅडेन यांनी उत्तर भारतातील कर्करोगग्रस्त खेड्यांविषयी खालील उद्गार काढले आहेत- ” कर्करोगाला या खेड्यांमध्ये गरिबांच्या शरीराची धूळधाण करायला अनिर्बंध आणि बेलगाम अशी मुभा दिली गेली आहे.” यावरून शहरांपेक्षा ग्रामीण भागात क्लेशशमन सेवेची जी गरज आहे ती किती तीव्र, व्यापक आणि मोठ्या प्रमाणात आहे ह्याची कल्पना करणे कठीण नाही.

ज्या भागांमध्ये अजूनही निरक्षरता, अज्ञान, गरिबी इत्यादी आव्हाने ठाण मांडून बसलेली आहेत त्या भागांमध्ये सर्वसमावेशक अशी क्लेशशमन सेवा उपलब्ध झाली तर तत्कालीन वैद्यकीय सेवेत असलेले दोष कमी करता येतील; सार्वजनिक आरोग्य सेवेला पडलेली छिद्रं किंवा भगदाडं बुजवता येतील आणि त्यामुळे एकूणच स्थानिक लोकांच्या जगण्याचा दर्जा वाढेल.”

यावरून ग्रामीण भागात या प्रकारच्या सेवेची किती गरज आहे हे दिसून येते.

वरील सर्व मुद्दे ध्यानात घेऊन ज्ञानप्रबोधिनीच्या छत्राखाली सोलापूर जिल्ह्यातील हराळी येथे ग्रामीण क्लेशशमन सेवेचा (Rural Maharashtra palliative care) उपक्रम दसऱ्याच्या मुहूर्तावर २०२३ मध्ये सुरु केला आहे.

Rural Maharashtra palliative care plan of action-

Phase 1– survey of the village population regarding the number of palliative care patients in the village communities with the help of ASHA workers,

Phase 2- identifying volunteers, social workers, nurses and MBBS/MD doctors for home based palliative care services;

Phase 3– training the above people using pallium India academic programs,

Phase 4- Putting together the essential medical gadgets such as BP machine, thermometer, pulse oximeter, a measuring tape, weighing balance, acucheck machine, hot & cold packs, wedge pillows  and then starting home visits as a team – a doctor, a nurse, a SW.

Phase 5- discussing patients with a doctor in person once a week at least and on telehealth as needed.

Essential medication list for hospice & Palliative care-

 

Palliative care Resources-

https://hospicecare.com/what-we-do/projects/consensus-based-definition-of-palliative-care/definition/

https://palliumindia.org/

 

IAPC’s palliative care course-

https://www.palliativecare.in/iapcs-certificate-course-in-palliative-care-for-volunteers-vccpc/

 

IAHPC-

https://www.palliativecare.in/iapcs-certificate-course-in-palliative-care-for-volunteers-vccpc/

 

Pallium India-

https://palliumindia.org/ 

 

elicit-basic-living-will-and-instructions-

Advanced care planning – https://palliumindia.org/2020/04/

FREE Volunteer Training Program (Online) – English

 

Article on Volunteership-

To be a trained and supported volunteer in palliative care – a phenomenological study | BMC Palliative Care | Full Text

 

About Akshaybhasha

 

अक्षयभाषा संस्था २००५ साली फिनीक्स, ॲरिझोना येथे स्थापन झाली. https://akshaybhasha.org

संपर्क : संस्थापिका- भाग्यश्री बारलिंगे  [email protected]

या संस्थेचे उद्दिष्ट ‘मराठी भाषेची गोडी वाढवून तिचे जतन करणे’ हे होय.

या साठी खालील उपक्रम आयोजित केले गेले किंवा होऊ घातले आहेत –

१. आबालवृद्धांसाठी प्राथमिक शाळेतील कवितांपासून दुर्गाबाईंच्या लिखाणापर्यंतचा अनुभव देणारा कार्यक्रम,

२. रंगमंचावर सादर केलेली बालनाट्ये -बाहुलीचे लगीन, मुहूर्त, डब्बाचोर, बालशिवाजी

३. रंगमंचावर सादर केलेल्या एकांकिका- लग्नाला जातो मी, निर्णय, विरंगुळा, इत्यादी

४. रंगमंचावर सादर केलेले भव्य कार्यक्रम- युनिव्हर्सल टागोर, पुलोत्सव, त्रिवेणी,

५. ऑन लाईन कार्यक्रम – पाऊस, दार, पुलोत्सव, चांदोबातील गोष्टी इत्यादी,

https://youtu.be/_rI3P7YWmFA

https://youtu.be/Jqdv1zGEMjU

https://wp.me/P64qsw-w7

https://youtu.be/drMOmxLEsDU

६. उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांसाठी एकता-अक्षयभाषा कथास्पर्धा,

https://akshaybhasha.org/2023/08/e-book-kathaspardha-2023/

७. उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून झूमवर मुलाखती,

https://youtu.be/MuJaQ3ZkPtU

https://youtu.be/CGXuUUG8tcQ

८. उत्तर अमेरिकेतील अमराठी लेखकांच्या मुलाखती – “शब्दकर्मी” चॅनेलवर,

https://youtu.be/lIHprb5Vvjo

९. “वाटा आणि मुक्काम” या चार दिग्ग्ज लेखकांनी ( आशा बगे, सानिया, भारत सासणे, मिलिंद बोकील ) लिहिलेल्या पुस्तकावर आधारित युट्यूब मालिका,

https://youtu.be/lyvgqSsgs0w

https://youtu.be/jZT9m9BAGPA

१०. नुकतेच सुरु होणारे चर्चासत्र – BMM प्रायोजित “मुलं परदेशी, आईवडील मायदेशी” ही झूम आधारित मालिका.

११. सामाजिक ऋणफेड – अनिमिया प्रोजेक्ट https://akshaybhasha.org/?s=anemia+

    पॅलिएटिव्ह केयर प्रोजेक्ट https://akshaybhasha.org/palliative-care-…a-harali-solapur/

Natyaparvanee -A program of one act plays on September 9, 2023

 

अक्षयभाषा संस्थेतर्फे फिनीक्समधील उत्साही आणि गुणी

अशी नवीन पिढी सादर करीत आहे “नाट्यपर्वणी” 

स्थळ : चँडलर सार्वजनिक वाचनालय

22 S. Delaware st., Chandler 85225

तारीख : शनिवार, ९ सप्टेंबर २०२३ 

वेळ : दुपारी दीड ते चार

सादरीकरणे : 

१. डॉ. मीना नेरुरकर लिखित “हिकटाऊनचा गणेशोत्सव”

कलाकार: अभिजित नेरुरकर, सुषमा ठाकूर-पाटणकर, मयुरी तारे, अतुल ठोंबरे, देवश्री भवसार,

अनघा वाळके, पराग प्रतापवार; कथन : निखिल देशपांडे; दिग्दर्शन : शिल्पा केळकर.

२. नामांकित लेखक के.ज.पुरोहित यांच्या कथेवर आधारित प्रहसन -“शिरवा”

कलाकार : अतुल ठोंबरे, अस्मिता देशमुख; दिग्दर्शन : अतुल ठोंबरे.

३. डॉ. भाग्यश्री बारलिंगे लिखित प्रासंगिका- “चंद्रमौळी घर”

कलाकार : आदित्य करमरकर, संपदा तेंडुलकर; कथन/दिग्दर्शन :अभिजित नेरुरकर.

 ४. आणि काही नाट्य प्रवेश.

कलाकारांना प्रोत्साहन देण्यास ह्या विनामूल्य कार्यक्रमाला जरूर यावे.

स्वयंप्रकाशी स्वरतारे Swayamprakashee Swartare – A fundraising program on August 27, 2023

 

Manogat-Bhagyashree Barlingay-SWST

 

Remarks on SWST- Madhura Bapat

 

 

कार्यक्रमाची केलेली जाहिरात-

अक्षयभाषा संस्थेने प्रायोजित केलेल्या “स्वयंप्रकाशी स्वरतारे” या कार्यक्रमाचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. मेसा आर्ट सेंटरच्या (1 E. Main st., Mesa 85201) व्हर्जिनिया पायपर रिपेरटोरी या प्रशस्त थिएटरमध्ये हा संगीत-कथन-नृत्याचा बहारदार कार्यक्रम रविवारऑगस्ट २७ ला दुपारी चार ते सात,

महाराष्ट्रातील पॅलिएटिव्ह केयर निधी उभारणीसाठी होणार आहे.

फीनिक्समधील मराठी भाषा कळणाऱ्यांना आग्रहाचे आमंत्रण !

लवकरात लवकर तिकिटे काढावीत ही विनंती ! https://akshaybhasha.org

 

Early bird Tickets for the Fundraiser for the Palliative care

in Maharashtra, sponsored by a non-profit organization, ‘Akshaybhasha’ : ‘Swayamprakashee Swartare’

– Highly appreciated program at the BMM 2022 convention

 

OnSunday Aug 27, 2023 from 4:30 pm -7 pm

at  Mesa Arts center (MAC) (1E Main st, Mesa, AZ 85201)

 

  1. Use this link https://akshaybhasha.org to pay for the tickets by clicking on the ‘donate’ button;
  2. Then write an email to [email protected]indicating how many tickets and in which row are needed by reviewing the attached seating map.
  3. Seat numbers will be designated by the host organization.
  4. Please, specify the email address to which

the Mesa art center box office should send

the e-tickets after August 20th.

  1. The box office ticketing will be available only on the day of the event.

Ticket pricing is as follows-

 

Special:    $100      (Pit Rows AA, BB, CC )

 

VIP:           $75      ( Orchestra Row A )

 

Platinum : $50              ( Orchestra Rows B and C )

 

Gold:         $25      ( Orchestra Rows E , F, G )

 

General :  $ 15    ( Orchestra Rows H, J, K, L )

 

Silver  :     $20      ( Balcony Rows A , B, C  & Box 1 &  2 )

 

Family/group packs – 10 % off-

 

VIP (Orchestra) :          A pack of 4 tickets = $ 270

 

Platinum (Orchestra) :  A pack of 4 tickets  =$180

 

Gold (Orchestra)  :          A pack of 4 tickets = $90

 

Silver (Balcony) :        A pack of 4 tickets = $72

****************************************

 

Please, donate generously  at :  https://akshaybhasha.org

 

***$500 – 2 tickets in the pit Rows AA,BB, CC

+ National geographic subscription for one year

+ a pass to the Mesa art center café

 

**$250-  2 tickets in the pit Rows AA,BB, CC

+ National geographic subscription for one year

****************************************

 

Tickets will be available from the Mesa Art Center  through this link on the day of the event- (This ticket sale will not be directly counted towards fundraising). 

https://boxoffice.mesaartscenter.com/Online/default.asp?BOset::WScontent::SearchCriteria::search_criteria=swst&BOparam::WScontent::search::article_search_id=EE8716B4-0827-4B0D-9ACB-038A148DF966&doWork::WScontent::search=1

****************************************

Seating map at the Mesa Art Center-                                

https://drive.google.com/file/d/193F-_uBxEF1VyHD_OYT96dTUSVdIPq7d/view?usp=share_link

 

****************************************

 

If any questions, please, contact Bhagyashree Barlingay at [email protected] .